Geography, asked by vibek9059, 1 year ago

२०१० नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे?

Attachments:

Answers

Answered by halamadrid
9

Answer:

भारतातील परंपरा, विविध जीवनशैली, सांस्कृतिक वारसा, रंगीबेरंगी सण, समुद्रकिनारे, वन आणि वन्य जीवन,रमणीय भूप्रदेश,संग्रहालये, तीर्थक्षेत्र, योग,आयुर्वेद,ऐतिहासिक स्मारके हे सगळे पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटन हा भारतातील सर्वात मोठा उद्योग असून तो राष्ट्रीय जीडीपीमध्ये ६.२३% आणि एकूण रोजगारामध्ये ८.७८% योगदान देतो.भारतामध्ये वार्षिक ५ दशलक्ष परदेशी पर्यटक येतात.

२०१० साली आयोजित कॉमनवेल्थ स्पर्धांमुळे,आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संदर्भात भारत, आशिया-प्रशांत प्रदेशात अकराव्या क्रमांकावर आणि संपूर्ण जगात ४० व्या क्रमांकावर होता.भारत सरकारने सुरू केलेली सर्वात यशस्वी मोहीम “अतुल्य भारत” मुळे २०१० मध्ये परकीय चलन कमाईत १४१९३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी वाढ दिसून आली.

पर्यटनामुळे आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मिती होती. भारत सरकार पर्यटन क्षेत्रात विकास योजना आणि आंतरराष्ट्रीय सहयोगाने रोजगार विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Explanation:

Answered by ishwarijadhav101
3

Answer:

भारतीय सण समारंभ उत्सव साजरे करण्याची पद्धत इ.

Similar questions