ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे?
Answers
Answer:
ब्राझील भरपूर प्रमाणात खनिजांचा उत्पादन करतो. या देशाचा खाणकाम व्यवसाय त्याच्या जीडीपीमध्ये जवळपास ७% योगदान देतो. समृद्ध खनिज स्त्रोतांसह ब्राझील जगातील एक अग्रगण्य खनिज निर्यातकर्ता आहे.
अर्थव्यवस्थेला खाण उत्पादनाचा फायदा होत असला तरी खाणकामाचे गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे पर्यावरणीय प्रभाव आहेत.
अॅमेझोन क्षेत्रातील घनदाट, अभेद्य जंगलांमुळे पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात खाणकाम मर्यादित आहे.या क्षेत्रात स्त्रोतांचा मोठा पुरवठा आहे परंतु,ते सहज उपलब्ध नाहीत तसेच त्यांच्याविषयी फारसे ज्ञानही नाही, त्यामुळे इथल्या स्त्रोतांचा वापर करता येत नाही.
तसेच,खाणकाम व्यावसायामुळे पाण्याच्या निसरणावर परिणाम होऊ शकतो, खाणीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे प्यायचे पाणी दूषित होते आणि अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे स्थानिक समुदायांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. इतर परिणामांमध्ये जंगलतोड, प्रदूषण, जमिनीवरील अतिक्रमण यांचा समावेश आहे.
या कारणांमुळे,ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे.
Explanation:
उत्तर : (१) ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साढ़े तुलनेने
(२) ब्राझीलच्या पश्चिम भागात अॅमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणेबांवर त्या
बंधने पडली आहेत. (३) या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी, येथे
खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही.
(४) या भागात वाहतुकीच्या सोईसुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे.