निवृत्त शिक्षकाचे मनोग
Answers
सा-या कोवळ्या जीवांना,
उजेडाचा गंध यावा..याचे
उजेडाच दान देण्या
झोपडीत सूर्य यावा.!"
शाळेबद्दल आजीबात आत्मीयता नसणा-या पालकांचे मन वळवण्यात मी यशस्वी ठरलो ,आणि याच पालकांनी दीड लाखाहूनही अधिक ग्रामसहभाग मला शाळा सुधारण्यासाठी दिला.सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे मी लक्ष दिले.आणि अल्पावधीतच विद्यार्थ्यात त्याचे प्रतिबिंब दिसू लागले.शाळेचे वातावरण बदलण्यासाठी मी स्वतः ब्रश हाती घेतला आणि शाळा सुटल्यानंतर शाळेचे वर्ग व सर्व भिंती रंगवून बोलक्या केल्या.शाळा सुंदर दिसू लागली आणि शाळाबाह्य विद्यार्थी शाळेकडे आकर्षित झाले व शाळेत रमू लागले. याच वेळी दुसरे शिक्षक श्री.खंडागळे सर शाळेवर रुजू झाले,त्यानंतर वैभव खेडकर हे सहकारी आले.आम्ही सर्वांनी मिळून शाळा सर्वांगसुंदर करण्यासाठी धडपड सुरु केली .याला साथ होती अर्थातच ग्रामस्थांची आमच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही ग्रामस्थांना सहभागी करून घेतले.त्यामुळेच ग्रामस्थांनी शाळेला एक खोली कार्यालयासाठी बांधून दिली.तीन संगणक,लाउडस्पीकर संच,फर्निचर दिले.शाळेची अनेक ,मुले नवोदय,शिष्यवृत्ती परीक्षेत चमकू लागली ,आणि आजूबाजूच्या गावांतून मुले आमच्या शाळेत शिक्षणासाठी येऊ लागली.४ थी पर्यंतची शाळा मी मुख्याध्यापक असताना ७ वी पर्यंत नेली.५४ विद्यार्थ्यावरून शाळेची पटसंख्या २२१ झाली आणि शाळेला शिक्षकांची ७ पदे मंजूर झाली.या शाळेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामद्धे झाली अनेक अधिकारी,पदाधिकारी, शिक्षक शाळेला भेटी देऊ लागले.ग्रामविकास मंत्री,महसूल राज्यमंत्री अशा अनेक पदाधिका-यांनी शाळेला भेटी देऊन शाळेचे कौतुक केले.एका शिक्षकाला आयुष्यभरात जेवढे हवे त्यापेक्षा कितीतरी पट अधिक प्रेम आणि समाधान या शाळेवर मला मिळाले.ही शाळा तर सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातून व विभागातून प्रथम तर राज्यातून तृतीय आलेली.सर्व शिक्षक अतिशय होतकरू व तडफदार ,त्यांच्या बरोबर काम करायला मजा आली .अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.या शाळेवर ई-लर्निंग सुरु करून राज्यातील पहिली जि.प.ई-लर्निंग शाळा आम्ही केली.हस्ताक्षर सुधार,बचत बँक;ज्ञानगौरव स्पर्धा,बाल आनंद मेळावा ,असे अनेक उपक्रम आम्ही राबविले.
शिक्षणाच्या या वाटेवर अविरत प्रवास करत असताना अनेक दीपस्तंभ मला भेटले.