निवृत्त शिक्षकाचे मनोगत मराठी निबंध
Answers
एक शिक्षक. अर्थात निवृत्त झालेला. आयुष्यातील पस्तीस वर्षे शिक्षण-क्षेत्रात घालवली आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. पूर्वी एक म्हण होती – 'नाही मिळाली भीक, तर मास्तरकी शीक.' मंडळी, मास्तरकी अशी टिंगल करण्यासारखी गोष्ट नाही. शिक्षक म्हणजे समाज घडविणारा एक घटक असतो. भावी पिढी, नागरिक घडविण्याची जबाबदारी असणारा शिक्षक असतो. पूर्वी आर्थिक लाभ होणारा हा व्यवसाय नव्हता.
खरे तर हा व्यवसाय नाहीच. हा एक पेशा आहे. हे एक व्रत आहे. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर त्याचे सार्थक करणारा पेशा !
काही शिक्षक खरेच असे होऊन गेले. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची आठवण यासाठीच होते. शिक्षणक्षेत्रात भरीव कार्य करणारे ते मोठे तत्त्वज्ञ होते. तत्त्वचिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा पैलू होता. हा आदर्श प्रत्येक शिक्षकाने ठेवला पाहिजे. _आज जेव्हा मी वर्तमानपत्रातून शिक्षणसंस्थांमधून होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचतो, तेव्हा मन दुःखी होते. खरे तर चारित्र्य शिक्षकाचा आचार असला पाहिजे. शिक्षण त्याचा स्वधर्म असला पाहिजे. विद्यार्थी त्याचे दैवत असले पाहिजेत.