नियतकालिके म्हणजे काय ते सांगून तुम्हाला माहित असलेला कोणत्याही एका नियत कालिकेविषयी विषय माहिती लिहा
Answers
Answer:
नियतकालिक: एका ठरावीक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक म्हणतात.
नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा०
द्वैवार्षिक - दोन वर्षांतून एकदा निघणारे
वार्षिक - वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे
षण्मासिक - दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे
त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी
द्वैमासिक - दोन महिन्यांतून एकदा प्रकाशित होणारे
मासिक - दर महिन्याला
पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी
द्विसाप्ताहिक - आठवड्यातून दोनदा
साप्ताहिक - दर आठवड्याला
दैनिक - दररोज प्रकाशित होणारे प्रकाशन.
या शिवाय अनियतकालिके म्हणजे क्वचितपणे प्रसिद्ध होणारी आणि कालबंधन नसणारे प्रकाशनही असते. अनियतकालिकांचा वाचकवर्ग मर्यादित असतो.
आठवड्यातून दोनदा आणि दोन आठवड्यातून एकदा प्रकाशित होणाऱ्या अशा दोनही प्रकारच्या नियतकालिकाला इंग्रजीत Biweekly असे म्हणतात.