नदीचे आत्मवृत्त, नदीची आत्मकथा, मी नदी बोलतेय – मराठी...
Answers
Answer: मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? ओळखलंत का मला? मी नदी बोलतेय. दूरच्या डोंगरामध्ये माझा जन्म झाला. लहानपणापासूनच मी अवखळ आहे. मी एका जागी स्वस्थ बसूच शकत नाही.
माझ्यामुळे लोकांना प्यायला पाणी मिळते. जलचक्रात माझी भूमिका फार महत्त्वाची आहे. माझ्या माध्यमातून विविध कारणांसाठी वाहतूक केली जाते. माझ्यामध्ये जैवविविधता आहे. माझ्या उदरातून तुम्हांंला खनिजे आणि इतर मौल्यवान वस्तू मिळतात. माझ्या पाण्यामुळे माझ्या आजूबाजूच्या गावातील शेतीला पाणी मिळते.
मी तुमच्या कितीतरी उपयोगी पडते. एकीकडे मला तुम्ही माता म्हणून मान देता आणि दुसरीकडे मला कचरा, घाण टाकून प्रदूषित करता. यामुळे मला फार वाईट वाटते. मी निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. माझ्या प्रदूषणामुळे तुमचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही माझे संवर्धन कराल अशी अपेक्षा मी करते.
Explanation: