Hindi, asked by chetanparbhankar27, 4 months ago

news writting on teachers day in marathi​

Answers

Answered by JaiMatadiSarthak
4

Answer:

शिक्षक दिन शनिवारी देशभर साजरा होत आहे. भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीदिन देशभर 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे योगदान अमूल्य असते. शिक्षक म्हणजे केवळ शाळा-महाविद्यालयातील शिक्षकच नव्हेत, तर जी व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते, ती आपली शिक्षकच असते. अशा सर्व शिक्षकांचे आभार मानण्याचा हा दिवस. सोशल मीडियावर या दिवशी शुभेच्छांचा पाऊसच पडतो. चला तर अशाच काही शुभेच्छा खास तुमच्यासाठी...वाचा आणि आपल्या आवडत्या शिक्षकांना पाठवा...

शिक्षक दिन विशेष: आवडत्या शिक्षकांना द्या शुभेच्छा...

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

----

जेव्हा देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते

तेव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानपात्र असतात.

- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

----

काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत

हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

-----

आधी 2G, नंतर 3G आणि आता 4G, 5G... भविष्यात 6G,7G सुद्धा येतील; पण एका G ला पर्याय नाही, ते म्हणजे

'गुरु G'

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

----

शिकवता शिकवता आपणास,

आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे,

आदराचे स्थान म्हणजे शिक्षक

- शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

----

Dear Teacher

You Are A

T - Talented

E - Enthusiastic

A - Adaptable

C - Creative

H - Honest

E - Efficient

R - Resourceful

----

शिक्षक दिन शुभेच्छा

राष्ट्रीय शिक्षक दिन

मला घडवलेल्या प्रत्येक शिक्षकाचे आभार..

----

विद्येविना मती गेली.. मती विना नीती गेली

नीतिविना गती गेली .. गती विना वित्त गेले

वित्ताविना शूद्र खचले.. इतके अनर्थ एका अविद्यने केले

या अविद्येचा काळोख हटवून विद्यारूपी प्रकाश देणाऱ्या.. सर्व शिक्षकांना

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

-----

कवी कुसुमाग्रजांची पुढील कविताही अनेक जण या दिवशी आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता म्हणून एकमेकांना फॉरवर्ड करत असतात. ही कविता अशी आहे -

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून

गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली

मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले

प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे

चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

---कुसुमाग्रज

महाराष्ट्र टाइम्सवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

Like

Follow

Telegram

डाउनलोड अॅप

Subscribe to Notifications

NEET-JEE: राज्यांची फेरविचार याचिका SC ने फेटाळली

महत्तवाचा लेख

या बातम्यांबद्दल अधिक वाचा:

शिक्षक दिन २०२० teachers day wishes teachers day 2020 Teachers Day Teacher's Day Wishes in Marathi how to wish teachers

Web Title : teachers day 2020 how to wish teachers on this teachers day

Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Get career news, latest marathi news headlines from all over India. Stay updated with us to get latest career news in .marathi

Marathi Newscareercareer newsteachers day 2020 how to wish teachers on this teachers day

Similar questions
Math, 2 months ago