nibandh on my favourite freedom fighter in Marathi
Answers
या भारतभूमीवर अनेक महान नेत्यांचा, वीरांचा जन्म झाला आहे. या सर्व नेत्यांनी तसेच स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशातही आणि समाजासाठी कार्य करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.
अशाच महान वीरांपैकी एक अमर क्रांतिकारी वीर होते ते म्हणजे शहीद भगतसिंग. ज्यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हसता – हसता आपल्या बलिदानाचा त्याग केला आहे. शहीद
शहीद भगतसिंग यांचा जन्म २७ सप्टेंबर, १९०७ साली पंजाब मधील लयालपूर जिल्ह्यातील बंगा या गावी एका शीख कुटुंबात झाला.
त्यांच्या आईचे नाव विद्यावती कौर आणि वडिलांचे नाव किशन सिंग असे होते. त्यांचे वडील सरदार किशन सिंग आणि काका स्वारण सिंग हे दोघे सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे स्वतंत्रता सैनिक होते.
भगतसिंग यांच्या जन्मानंतर त्यांच्या आजीने त्यांचे नाव ‘भागो वाला’ असे ठेवले. ज्याचा अर्थ होतो – चांगले नशिबवाला. त्यानंतर ते भगतसिंग या नावाने ओळखले जाऊ लागले.
भगतसिंग हे लहानपणापासून हुशार होते. ते लहान असतानाच वीरांचे खेळ खेळत असत. त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून देशप्रेमाची भावना भरलेली होती.
भगतसिंगने आपले प्राथमिक शिक्षण आपल्या गावातच पूर्ण केले. त्यांनी आपल्या वयाच्या १४ व्या वर्षांपासून पंजाबमधील क्रांतिकारक संस्थांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी डी. ए. व्ही शाळेतून नववीची परीक्षा दिली.
भगतसिंग कॉलेज मध्ये शिकत असताना त्यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली.
त्याची मदतनीस आशा आहे....
plz मला मेंदूतली म्हणून चिन्हांकित करा