Hindi, asked by saranggaikwad558, 7 months ago

nibhanda lekhan
marathi
topic:- पृथ्वी बोलू लागली---

who will ans fast i will mark as brainleast and 10 thanks ,rate 5.5​

Answers

Answered by vaiahnavisp1929
1

Answer:

22 एप्रिल' सगळे जग वसुंधरा दिन साजरा करत होते, त्यावेळी मनात आले ही वेळ का आली माणसांवर ? माणसाने एवढा उच्छाद मांडला आहे की शेवटी या माणसाला जाणीव करून द्यावी लागते, ' अरे, वसुधा वाचव.' खरेच, ही पृथ्वी माणसासाठी बोलू लागली तर ?........ तर काय सांगेल ति बरे ?

समग्र सूर्यमाला विचारत घेतली, तर सजीव तेला आधार लाभला तो फक्त पृथ्वीतलावर. हे अवनीतल . त्यावरचे अंबर आणि या दोघांमधल्या अवकाशात निरंतर नांदणारे वातावरण हे जीव जातीचे अंतिम आश्रयस्थान आहे; पण आज आपल्या बुद्धीचा गर्व झालेला माणूस हे सर्व विसरला आहे. त्याने आपल्या भोवतालच्या पर्यावरणाचा आपल्या कृतीने नाश केला आहे

मानवा खेरीज अन्य जीव धरी तिशी कृतज्ञ राहिले आहेत. मुंगीपासून गरुडा पर्यंत सर्वजण धरतीची कृतज्ञ राहिले आहेत. मुंगीपासून गडापर्यंत सर्वजण धरतीची प्रकृती सांभाळून आपली जीवनयात्रा पुढे करण्याचा प्रयत्न करीत आले; माणूस मात्र आज धरेला आसवे गळायला लावत आहे. सिमेंटची जंगले उभारतांना हिरवाईचा घात झाला. माणूस निसर्गापासून दूर चालला आहे. वाढती वृक्षतोड वनस्पतींच्या वंशवृक्ष आवर आघात करते आहे. जंगलतोड एवढी झाली की जंगलातील प्राण्यांना पुरेसे खाद्य मिळेनासे झाले; मग स्वाभाविकच त्यांची पावले मनुष्यवस्ती कडे वळू लागली. प्राण्यांच्या अनेक जाती नामशेष झाल्या. अगदी बालपणापासून माणसाची मैत्री असलेले चिऊताई आजकाल मोठ्या शहरातून अदृश्य झाली आहे. परवा कुठेतरी वाचले की, शहरातील वाढती मोबाईल संख्या चिमण्यांच्या जनाला घातक ठरत आहे.

' अतिपरिचयात अवज्ञा' असे आपले पूर्वज सांगून गेले आहेत. त्याचा प्रत्यय आज आपल्या पाण्याच्या बाबतीत येत आहे. सुदैवाने आपली भूमी सुजलाम सुफलाम असल्यामुळे आपल्याला पाणी मुबलक मिळत होते. आपण त्याचा गैरवापर केला त्यामुळे आता पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे आपल्या तोंडाचे पाणी पळत आहे . नद्यांचे पाणी आटत चालले आहे. पात्र घटक चालली आहे. पृथ्वीच्या उदरातील पाण्याचा साठा संपत आला आहे. उपलब्ध पाणी कारखान्याच्या मुलीं पाण्याने दूषित होत आहे. अनेक रत्ने धारण करणाऱ्या वसुंधरेला हे किती वेदनादायी ठरत असेल बरे !

देणे आपल्या जवळ जे जे मौल्यवान होते ते माणसाला गेले; कृतज्ञ होत चालला. त्यामुळे आज नापीक, वेताळ भूमीचे क्षेत्र वाढू लागले आहे. उलटपक्षी खाणारी तोंडे मात्र भरमसाठ वाढली आहेत. कसे सांभाळायचे हे ओझे पृथ्वीने ? हरित क्रांति, श्वेतक्रांती झाली तरी अब्जावधी जनतेची भूक कशी भागवायची ? मग हे उपासमारीने ग्रस्त एकमेकांच्या जीवावर उठणार ! कसे पाहायचे बरे हे अवनी मातेने ?

आपण पृथ्वीला तुडवतो, ते साडेतीन सहन करते; म्हणून तर तिला' क्षमा' असे संबोधतात. अशा या पृथ्वी मातेला माणसात वाढलेला हिंसाचार तरी कसा सहन व्हावा ? अपरिमित मनुष्यहानी, वित्तहानी करणारी दोन महायुद्धे तिने कशी सहन केली असतील ? आता जगात सर्वत्र वाढलेला दहशतवाद तिला क्षणाक्षणाला किती कंपित करत असेल ?

पृथ्वी बोलू लागली तर आपल्या सर्व व्यथा ती आपल्या मानव पुत्रा पुढे मांडेल आणि

Similar questions