notebandi vardan ki abhishap essay in marathi
Answers
Answer:
I don't know Marathi language
■■नोटबंदी वरदान की शाप■■
नोटबंदीचे वेगवेगळे फायदे आहेत. नोटबंदीमुळे भारत सरकारला काळ्या धनाचा पत्ता लावण्यासाठी मदत झाली. आरबीईच्या अंदाजानुसार बैंक खात्यांमध्ये तीन लाख कोटी पेक्षा जास्त काळे धन जमा झाले.
काही लोक काळ्या धनाचा वापर दहशतवादला निधी पुरवण्यासाठी,जुगारासाठी आणि सोने, रियल इस्टेट यासारखे प्रमुख संपत्तींची किंमत वाढवायसाठी करायचे. या सगळ्या बेकायदेशीर गोष्टींवर काही प्रमाणात रोख आणण्यासाठी नोटबंदी उपयोगी ठरली.
नोटबंदीमुळे लोक बैंक खात्यात पैशे जमा करत असल्यामुळे चांगल्या प्रमाणात कर जमा झाले, ज्याचा वापर करून सरकार लोकांना चांगल्या सुविधा जसे चांगले रस्ते, हॉस्पिटल,शैक्षणिक संस्था उपलब्ध करून देऊ शकते.
परंतु, नोटबंदीचे काही नुकसान देखील आहेत.नोटबंदीमुळे लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली. जुने नोट बदलण्यासाठी लोकांनी बैंकांसमोर रांगा लावल्या.
पण, नवीन नोट पर्याप्त संख्येत उपलब्ध नसल्यामुळे, लोकांच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम झाला. नोटबंदीमुळे, नवीन नोट प्रिंट करण्यासाठी आणि जुने नोट नष्ट करण्यासाठी सरकारचे खूप पैशे खर्च झाले.
ज्या लोकांकडे काळा धन होता ,अशा लोकांनी सोने, रियल इस्टेट आणि इतर गोष्टींमध्ये पैशे गुंतवून काळा धन संपवला.अशा लोकांवर नोटबंदीचा काहीही फरक नाही झाला.
अशा प्रकारे, नोटबंदीचे फायदे व नुकसान दोन्हीं आहेत.म्हणून, नोटबंदीला वरदान व शाप दोन्हीं समझता येईल.