१५ ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून का साजरा करतो ?
Answers
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन : १५ ऑगस्ट हा दिवस आपण स्वतंत्रदिन म्हणून साजरा करतो. कारण १५ ऑगस्ट १९४७ ला अनेको लोकांचे प्रयत्नातून, केलेल्या चाडवडीतून भारताला इंग्रजांन पासन संपूर्ण स्वतंत्र मिळवून देण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन याच दिवशी ब्रिटिशांच्या जवळपास १५० वर्षांच्या गुलामीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आणि नागरिकांनी स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला. भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक ज्ञात आणि अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मध्यरात्री घड्याळात १२ च्या ठोका वाजला आणि भारत स्वातंत्र्य झाला.
{ More info : भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताकडे स्वतःचे राष्ट्रगीत नव्हते. रवींद्रनाथ टागोरांनी १९११ मध्येच जन गण मन लिहिले असले तरी ते १९५० मध्ये राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. प्रत्येक स्वातंत्र्यदिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवतात. पण १५ ऑगस्ट १९४७ रोजी असे घडले नाही. लोकसभा सचिवालयातील एका शोधनिबंधानुसार, जवाहरलाल नेहरूंनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवला. }