Science, asked by sumaiya7073, 20 days ago

ऑक्टोपस च्या वर्गीकरण करा?​

Answers

Answered by thakareprashant549
1

Answer:

शोध पोर्टल

ऊर्जा

पर्यावरण

जैवविविधता - प्राणी

ऑक्टोपस

अवस्था:

उघडा

ऑक्टोपस

मृदुकाय (मॉलस्का) संघातील शीर्षपाद (सेफॅलोपोडा) वर्गातील ऑक्टोपोडा गणाच्या ऑक्टोपोडिडी कुलातील सागरी प्राणी. ऑक्टोपसाचे शास्त्रीय नाव ऑक्टोपस व्हल्गॅरिस आहे. रात्री संचार करणारा हा प्राणी मांसाहारी आहे. गोगलगायीसारख्या प्राण्यापासून याची उत्क्रांती झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे. यांच्या सु. १५० जाती जगभर आढळतात. त्यातील काही उथळ समुद्रकिनारी तर बर्‍याचशा समुद्रतळाशी राहतात. ऑक्टोपस ऑक्टोपसाचा आकार वाटोळा असून शरीराचे डोके आणि धड असे दोन भाग पडतात. तोंडातील लहान परंतु कठिण असा चोचीसारखा भाग सोडल्यास संपूर्ण शरीर मऊ असते. डोक्यावर मोठे डोळे असतात. ऑक्टोपसाची दृष्टी तीक्ष्ण असते. शरीराला वळवळणार्‍या आठ भुजा जोडलेल्या असतात. शरीराला कवच नसल्याने खडकातील बारीक कपारीत त्यांना सहज शिरकाव करता येतो. त्यामुळे राहण्यासाठी ते अशाच जागा निवडतात. प्रत्येक भुजेवर चूषकांच्या दोन रांगा असतात. सरपटत जाणे व भक्ष्य पकडणे यांकरिता भुजांवरील चूषकांचा वापर होतो. कासव, मासे, म्हाकूळ तसेच इतर कवचधारी सागरी प्राणी यांचा समावेश ऑक्टोपसाच्या आहारात होतो. खेकडे हे त्यांचे आवडते खाद्य आहे. त्यांच्या जबड्यांचा आकार पोपटाच्या चोचीसारखा असतो. भुजांद्वारे भक्ष्य पकडून जबड्याने ते चावतात व लाळग्रंथीतून त्यात विष सोडतात. जर भक्ष्य कठिण कवचाचे असेल, तर जिभेसारख्या अवयवाच्या साहाय्याने ऑक्टोपस कवचाला भोक पाडतात व त्यातून विष आत सोडतात.

आठपैकी एक भुजा प्रजननाच्या दृष्टीने मोठी होते. फलन होताना याच भुजेद्वारे नरातील शुक्राणुधर मादीकडे दिली जातात. निरनिराळ्या जातींनुसार मादी एका वेळेस साधारणत: १-५ लाख अंडी देते. राहत्या कपारीतील वरच्या छताला मादी अंडी चिकटविते व देखभाल करते. अंड्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा व ती स्वच्छ राहावीत म्हणून मादी अंड्यांवर सतत पाण्याचा फवारा मारीत असते. पाण्याचे तापमान व सभोवतालची परिस्थिती यांनुसार पिले बाहेर येण्याचा काळ ठरतो. ४-८ आठवड्यांत पिले बाहेर येऊ लागतात.

ऑक्टोपस हा सील, काही देवमासे व मोठे मासे यांचे खाद्य आहे. संरक्षणासाठी तो निरनिराळ्या युक्त्या वापरतो. त्वेचतील रंगद्रव्य असलेल्या खास पेशींच्या साहाय्याने पटकन रंग बदलणे, शरीरात ओढलेल्या पाण्याचा जोरदार फवारा मागे सोडत रॉकेटसारखे वेगाने पोहत जाणे, पाल शेपटी तोडते त्याप्रमाणे भुजा तोडणे अशा युक्त्या काही जाती वापरतात. शरीरातील विशिष्ट वर्णधारी कोशातून काळ्या रंगाचा फवारा सोडून भोवतालचा परिसर काळा करणे व त्यामागे लपून निसटणे, अशी विलक्षण युक्तीही काही ऑक्टोपस वापरतात. स्वत:चा बचाव करण्याखेरीज एकमेकांशी निरनिराळ्या प्रकारचे संवाद साधण्यासाठी ते रंग बदलतात.

ऑक्टोपसाची चेतासंस्था अतिशय विकसित असल्याची आढळते. त्याच्यामध्ये शिकण्याची क्षमता दिसते. म्हणूनच वैज्ञानिकांसाठी ऑक्टोपस हा कुतूहलाचा विषय आहे. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये सर्वांत बुद्धिमान प्राणी म्हणून तो ओळखला जातो. आतापर्यंतच्या माहितीनुसार, सु. १० मी. लांबीचा सर्वांत मोठा व सु. २.५ सेंमी. लांबीचा सर्वांत लहान ऑक्टोपस आढळले आहेत. ऑक्टोपसाच्या काही जातींचा उपयोग आहारात केला जातो. जपान, चीन, इटली इ. देशांत ऑक्टोपसापासून तयार केलेले अन्नपदार्थ रुचकर मानले जातात. ऑक्टोपसांचे आयुष्य ६ महिने ते ३ वर्षे असते.

Similar questions