ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ विषयावर मराठीत निबंध
Answers
Answer:
photo send karu ka
Explanation:
reply dya mla send karu ka
Explanation:
विश्वशांती तसेच विश्वबंधुत्वाचा मूळ उद्देश असलेले 30वे ऑलिम्पिक लंडन येथे भरणार आहे. लंडन शहराने यापूर्वी दोन वेळा (1908 आणि 1948) आयोजनाची वैशिष्ट्ये जपताना अस्थिरतेत आणि काहीशा अडचणीत असलेल्या ‘ऑलिम्पिक’ला स्वत:च्या पायावर उभे करण्यात मोठा वाटाही उचललेला आहे...
विश्वशांती, विश्वबंधुत्व, सहिष्णुता, सामंजस्य, मैत्री वगैरे मानवतावादी उदात्त संकल्पना आपल्या कानावर येतात, त्याच क्षणाला ‘या जगात खरीखुरी शांतता नांदणे कधीतरी शक्य आहे का? आणि तशी ती कोणाला हवी तरी आहे का...?’ हा प्रश्न आणि ‘अशक्य’ हे त्याचे उत्तरही लगेचच मनात येते. अर्थात ग्रीकांच्या प्राचीन ऑलिम्पिकच्याच नव्हे तर अगदी आपल्याकडच्या वेद-पुराणाच्याही शेकडो वर्षे आधीपासून जगभरातल्या तत्कालीन साधू-संत आणि धार्मिक तत्त्ववेत्त्यांकडूनही शाश्वत मानवतावादी मूल्यांचा पाठपुरावा केला जात होता, हे वास्तव नाकारता येत नाहीच. किमान एक-दीड हजार वर्षे आधी (विशेषत: ग्रीकांच्या संबंधात नक्कीच) बेफामपणे सैरभैर फिरणाºया रानटी-टोळ्या निव्वळ लुटींवर समाधानी नव्हत्या, तर त्यांना एकाच वेळी शेकडो-हजारो माणसांच्या रक्ताची चटक लागलेली होती. एवढेच नव्हे, तर सैतानी आणि राक्षस प्रवृत्तींनाही लाजवेल एवढ्या अमानुष कत्तलींनी सर्वत्र भीषण थैमान घातले होते.
अखेरीला ग्रीसभर पसरलेल्या डोरिअन्स टोळ्यातील अंतर्गत बंडखोरी आणि परस्परांतील कत्तलींतून ती संस्कृतीच संपुष्टात आली. तेव्हाच कुठे पाच-सहा शतकांच्या सैतानशाहीतून सर्वसामान्य लोकांना काही काळ तरी सुटकेचा मोकळा श्वास घेता आला आणि ग्रीकांच्या प्राचीन सुवर्णपर्वाला प्रारंभ झाला. तेव्हा मात्र शेकडो वर्षांनी पुन्हा एकवार विश्वशांती-विश्वबंधुत्वाचे स्तोत्र गाण्यासाठी तत्त्ववेत्त्यांना कंठ फुटला. धार्मिक प्रवचनकार आणि त्यांचे विवेचक मानवतावादी विचार घेऊन सर्वसामान्यांच्या संपर्कात जाऊ लागले. बघता-बघता वातावरण बदलत गेले. धर्मस्थळांना आणि धार्मिकतेला पुन्हा बहर आला. नव्हे, प्राचीन ग्रीकांच्या सुवर्णपर्वाची (इ. स. पूर्व 800) ती सुरुवात होती. ग्रीक तत्त्ववेत्ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर मानवतावाद आणि शांतता यासाठीच्या चळवळीसाठी एक कायमस्वरूपी माध्यम म्हणून त्यांनी ग्रीकांच्या थेट पारंपरिक भक्तिभावालाच हात घातला. परमेश्वराची उपासना आणि त्यांच्या रक्तातच भिनलेले क्रीडाप्रेम यावर आधारलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांना जन्म (इ.स.पूर्व 776) दिला.
प्राचीन ऑलिम्पिकच्या छुप्या उद्दिष्टांत सभोवार विखुरलेल्या बारा देशांतील ग्रीकांना एकाच निवासात एकत्र आणणे, अग्निदेवतेच्या (ज्योत) साक्षीने झ्यूस देवाच्या उपासनेबरोबरच त्यांच्या मनावर विश्वबंधुत्वाची, शांततेची, एकात्मकतेची, मानवतावादाची बीजे पेरणे आदींचा समावेश होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येणाºया सुमारे चाळीस-पन्नास हजार प्रेक्षकांमध्येही एकोप्याचे-मैत्रीचे वातावरण असे. स्पर्धेच्या कालावधीत लढाई बंदीचे कायदेशीर करार होत असत. प्राचीन ऑलिम्पिकमधील त्याच संस्कारांचा आणि नीतिमूल्यांचा धागा पकडून, बॅरन द कुबर्टिन या फ्रेंच तत्त्ववेत्त्याने ‘ऑलिम्पिक’ या मानवतावादी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. तिला आधुनिकतेचा साज चढवतच पहिले ऑलिम्पियाड ग्रीसमध्येच (अथेन्स 1896) साजरे झाले. पुढे कुबर्टिन यांच्या प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीही (1894) स्थापन झाली. अर्थात, प्राचीन काळ सर्वार्थाने इतिहासजमा झालाय. केवळ भौतिक सुख-सुविधा-समृद्धीने नव्हे तर आचार-विचारांनीसुद्धा त्यातला माणूस बदलला आहे. बदल झाला नाही तो त्याच्या उपजत स्वभावधर्मातील (काळ्या बाजूतील) पाशवी वृत्तीत.
थोडक्यात, विश्वबंधुत्व, विश्वशांती, सहिष्णुता वगैरे मानवतावादी चळवळींची काही हजार वर्षांपूर्वी होती तेवढीच गरज आजही आहे. हीच गरज ओळखून आज वर्षातील 365 दिवस आणि दिवसाचे 24
तास, जगाच्या पाठीवर-कुठे उंच उंच पर्वतराजींवर तर कुठे खोल खोल समुद्रात, कुठे बर्फावर, तर कुठे मऊ मऊ मातीच्या जमिनीवर, कुठे शहरात तर कुठे खेड्यांत, दिवस-रात्र विविध प्रकारांतील आंतरराष्ट्रीय क्रीडा
स्पर्धांचा आवाज घुमत आहे. त्यातून हजारो-लाखो-कोटी लोक एकमेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटत आहेत.
अशा या क्रीडासागरात ऑलिम्पिकच्या निमित्ताने देश, धर्म, लिंग, वंश, वय, जातपात, व्यवसाय, भाषा आदींचा भेदाभेद न ठेवता हजारो खेळाडू, अधिकारी, पत्रकार एकाच संकुलात एकमेकांच्या सहवासात वास्तव्य करतात, भाषा समजत नसेल तर हातवारे आणि देहबोलीतून भरपूर गप्पा मारतात, एकमेकांना समजून घेतात, भोजन घेतात, गाणी गातात, सांघिक नृत्य करतात, वाद्ये वाजवतात, हसतात, खेळतात, मैत्री करतात, परस्परांना भेटवस्तू देतात-घेतात, एकमेकांची छायाचित्रे काढून आपल्या आठवणी जपतात. गहिवरून आलिंगन देत एकमेकांचा निरोप घेतात आणि येथेच खºया अर्थाने ऑलिम्पिक आयोजनामागील विश्वशांतीचा मूळ उद्देश सफल झालेला असतो.