Hindi, asked by aryan57589, 7 months ago

ऑलिंपिक सामन्यांमध्ये भारताचा सहभाग कमी आहे. त्याची काय कारणे असू शकतील? त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो.​

Answers

Answered by ayedage775
2

Answer:

पूर्वीच्या काळी ऑलिंपिक स्पर्धा सुरू झाल्या की, काही ठराविक लोक वगळता कोणी त्या स्पर्धांकडे पहातही नसे. कारण त्या स्पर्धेमध्ये भारताला काही मिळणार नाही, अशी सर्वांनाच खात्री असे. निदान पहिल्या २५ ऑलिंपिक स्पर्धांपर्यंत तरी भारताला हॉकी वगळता अन्य कोणत्याही खेळात कधी पदक मिळालेले नव्हते. मात्र गेल्या दोन-तीन ऑलिंपिकमध्ये थोडे चित्र बदलत गेलेले दिसले. लिएंडर पेसने याने सुरुवात केली, त्यानंतर करनाम मल्लेश्वरी हिने एक रौप्य पदक मिळवले. तिच्या बरोबरच नेमबाजीत भारताला एक रौप्य मिळाले. गेल्या ऑलिंपिकमध्ये अभिनव बिंद्रा, सुशीलकुमार आदि तीन पुरस्कार मिळाले आणि भारतीय संघ यापुढे ऑलिंपिक स्पर्धांमधून हात हलवत परत येणार नाही, अशी खात्री पटली. २००८ सालच्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये तीन पदके मिळविणार्या भारतीयांकडून २०१२ च्या ऑलिंपिकमध्ये थोड्या अपेक्षा वाढल्या होत्या. कारण २००८ साली भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे भारताला यावर्षी निदान अर्धा डझन तरी पदवे मिळावीत असे वाटत होते.

भारतीय खेळाडूंकडून फारच आशा बाळगणार्यांनी तर यावर्षी लंडनमधून भारताचे खेळाडू निदान एक डझन तरी पदके आणतील, असे म्हटले होते. परंतु ही अपेक्षेची अतिशयोक्ती होती. ती तशी असली तरी यावर्षी भारतीयांनी तीन पेक्षा अधिक पदके मिळवली तरी आपल्याला समाधान होते आणि ते समाधान पूर्ण झाले आहे. सहा जणांनी पदके मिळवली आहेत. त्यात सुशीलकुमार याने मल्लविद्येत रौप्य पदक मिळवले आहे आणि विजयकुमार याने नेमबाजीमध्ये एक रौप्य पदक मिळवले आहे. ही दोन रौप्य पदके आणि चार कांस्य पदके ही भारताची यावर्षीची कमाई ठरली आहे. कांस्य पदक मिळविणार्यांमध्ये नेमबाज गगन नारंग, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, मुष्टीयोद्धी एम.सी. मेरिकोम आणि कुस्तीगीर योगेश्वरदत्त या चौघांचा समावेश आहे. म्हणजे दोन नेमबाज, दोन कुस्तीगर, एक मुष्टीयोद्धा आणि एक बॅडमिंटनपटू. अशी भारताची पदकांची कमाई आहे. ही सहा पदके मिळविणार्यांमध्ये दोन महिला आहेत आणि सुशीलकुमार याने सलग दोन वेळा रौप्य पदक मिळवलेले आहे. मेरिकोम हीला मिळालेले पदक हे एक आश्चर्य आहे. कारण ती विवाहित असून दोन मुलांची आई आहे आणि स्पर्धेतल्या सहभागाच्या बाबतीत खंड पडलेला होता.

अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा तिने कांस्य पदकापर्यंत मजल मारली. ही भारताची एक उपलब्धीच आहे. गगन नारंग याने आजवर जगातल्या अनेक स्पर्धा गाजवलेल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडून बर्याच अपेक्षा होत्या. तो सुवर्णपदक मिळवेल असे वाटले होते. पण त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पदक मिळाले असले तरी त्याच्या बाबतीत थोडी निराशा झालेली आहे. अशीच निराशा सायना नेहवाल हिच्या बाबतीत झाली. तिने सतत गेल्या दोन वर्षांपासून बॅडमिंटन स्पर्धा जिंकलेल्या होत्या. बॅडमिंटन म्हणजे चिनी खेळाडू असे समीकरण तयार झालेले आहे आणि त्यामुळे या खेळात चिनी खेळाडूंचे मोठे वर्चस्व आहे. मात्र सायना नेहवालने जगभरातल्या अनेक स्पर्धा जिंकताना चिनी खेळाडूंना सुद्धा पराभूत केले होते. त्यामुळे ती ऑलिंपिकच्या उच्च शिखरावर जाणार आणि सुवर्ण पदक मिळवणार, अशी अपेक्षा होती. तिलाही गगन नारंग प्रमाणेच कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तिला कांस्य पदक मिळाल्याचा आपल्याला आनंद आहे, पण सुवर्ण पदक मिळाले नाही याचा खेदही लपवता येत नाही. अशीच निराशा अभिनव बिंद्राने केलेली आहे. गतवर्षी तो सुवर्णपदक विजेता ठरला होता. पण यंदा पहिल्याच काही फेर्यांमध्ये बाद झाला आणि यावर्षी अक्षरश: हात हलवत परत आला.

भारताच्या टेनिसपटूंनी स्पर्धेत जाण्याआधी बरेच नखरे केलेले होते. महेश भूपती याने पेस बरोबर खेळणार नाही, अशी अट घातली होती आणि त्यातून राजकारण झाले होते. सानिया मिर्झा भारताकडून खेळली, परंतु तिच्या मर्जीविरुद्ध मिश्र दुहेरीमध्ये ती पेसबरोबर खेळली. महेश भूपती आणि बोपन्ना या दोघांनीही सायना नेहवाल प्रमाणेच वर्षभर उत्तम परफॉर्मन्स् दाखवलेला होता आणि लिएंडर पेस हा तर एक पदक प्राप्त केलेला खेळाडू आहे. त्यामुळे टेनिसमध्ये भारताला बरेच काही मिळेल, अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र या खेळाने आपली घोर निराशा केली. ज्यांना पदके मिळाली त्यांचे भरभरून अभिनंदन होत आहे आणि ते ज्या राज्यातून आलेले असतील त्या राज्याची सरकारे त्यांच्यावर लाखो रुपयांच्या पुरस्काराची बरसात करत आहेत. या सगळ्या खेळाडूंचा इतिहास पाहिला तर ते सामान्य परिस्थितीतून वर आलेले आहेत. त्यांच्यावर आता बक्षिसांची बरसात करण्या ऐवजी त्यांच्या तयारीच्या काळात त्यांना काही मदत दिली असती तर त्यांची कामगिरी यापेक्षा चांगली झाली असती. निदान आता तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी जागतिक किर्तीचे खेळाडू तयार करण्यासाठी भरपूर सवलती आणि सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

Explanation:

plz mark me as brainlist

Similar questions