Hindi, asked by ansarirehan1054, 2 days ago

ऑनलाइन पढ़ाई के फायदे और नुकसान निलो​

Answers

Answered by gawandegayatri624
1

Answer:

ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थी नेहमी एकाग्रतेने समजून घेतायेत की नाही हाच मूळ प्रश्न आहे. ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावे लागतील तरच अशा प्रकारचे शिक्षण हे भविष्यातील शिक्षण होऊ शकेल.

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे सर्वप्रथम जाणून घेऊयात. सर्व प्रकारची माहिती ऑनलाईन उपलब्ध झाल्याने शिक्षण सुद्धा ऑनलाईन देता येऊ शकते हे सध्या स्पष्ट झाले आहे. विद्यार्थी मोबाईल, हेडफोन्स आणि इंटरनेट सुविधा अशा गोष्टींनी ऑनलाईन शिक्षण सहज घेऊ शकतो.

प्रत्येक शिक्षक सध्या विशिष्ट व्हिडिओ ऍप द्वारे विद्यार्थ्यांशी संपर्कात येत आहेत. त्यावरच ऑनलाईन क्लास सुरू होत आहे. शिक्षक आपल्या स्वतःच्या घरी आणि विद्यार्थी आपल्या घरी! म्हणजेच घरबसल्या शिक्षण सुरू झालेले आहे.

इंटरनेट सुविधा असल्याने शिक्षण तसेच इतरही सामान्य ज्ञान मुबलक स्वरूपात आपण मोबाईलवर वाचू अथवा पाहू शकतो. सर्व पुस्तके आणि त्यातील स्वाध्याय शिक्षक ऑनलाईन लिंक शेअर करून च विद्यार्थ्यांना देतात. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन च नोंद केली जाते.

ऑनलाईन शिक्षण घेता येऊ शकते तर ऑनलाईन परीक्षा सुद्धा देता येऊ शकते. विद्यार्थी घरूनच पेपर सोडवून त्याचे फोटो काढून शिक्षकांना ऑनलाईन सबमिट करतात. त्यामुळे शिक्षणातील परीक्षेचा आणि बैठकीचा वेळ वाचला असे म्हणता येईल.

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे देखील जाणून घ्यायला हवेत. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नसते त्यामुळे आपण पाहतो की शाळेत विविध उपक्रम सुद्धा घेतले जातात ज्यांद्वारे व्यक्तिमत्त्व विकास शक्य होत असतो. ऑनलाईन शिक्षणात अशा विकासाची उणीव नक्कीच भासते.

शाळेत खेळ, कला, तसेच इतर सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात त्यावेळी विद्यार्थी नव्याने काहीतरी शिकत असतो. त्याचे नवनवीन मित्र बनत असतात. वागणूक, स्वभाव, नैतिकता तसेच व्यवहारज्ञान या सर्व गोष्टी तो शाळेत शिकत असतो परंतु ऑनलाईन शिक्षणात अशा उपक्र मांची उणीव जाणवते.

मोबाईल आणि इंटरनेट सुविधा सतत वापरल्याने विद्यार्थ्यांना त्याचे व्यसन जडू शकते. विद्यार्थी तासनतास मोबाईल च घेऊन बसतील ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर, मानेवर, आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय सोशल मीडियाचा वापर सातत्याने करणे याचीही शक्यता नाकारता येत नाही.

शाळेत गेल्यावर मित्र – मैत्रिणी आणि शिक्षकांचा सहवास लाभत असतो. त्यांच्या सहवासाने विद्यार्थी घडत असतात. असा सहवास ऑनलाईन शिक्षणात जाणवत नाही. त्यामुळे ऑनलाईन माध्यमाचा गरजेपुरता उपयोग करणे फायदेशीर ठरेल आणि शाळा नियमित सुरू असलेल्या सर्वांनाच आवडतील.

तुम्हाला ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे हा मराठी निबंध (Online Shikshanache Fayde ani Tote Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Similar questions