ऑनलाइन शिक्षण पद्धती निबंध in marathi
Answers
Explanation:
कोरोना विषाणूने आपल्या जीवनपद्धतीत मोठा बदल घडवून आणला आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरतानाचे नियम, वर्क फ्रॉम होम संस्कृती, स्वच्छता अशा गोष्टी निर्धारपूर्वक अंगवळणी पाडाव्या लागणार आहेत. शिक्षण पद्धतीत होऊ घातलेला बदलही विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांनाही पचवावा लागणार आहे. त्यामुळेच ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह आणि गरज, फायदे आणि तोटे, त्यासाठीच्या अटी याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे.
रेल्वेची तिकिटे बुक करण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्यापेक्षा आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून बुकिंग करणे, वाणसामान ॲमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन दुकानातून मागवणे, दूरवरच्या नातेवाईकांशी व्हिडिओकॉलच्या माध्यमातून बोलणे, मनीऑर्डरच्या ऐवजी गुगल-पे यूपीआय भीमसारख्या पोर्टलचा वापर करणे, हवामानाचा अंदाज घरबसल्या घेणे… याची आता आपल्याला सवय होऊ लागली आहे. या सगळ्यांमधला समान धागा म्हणजे तंत्रज्ञानाने पुसून टाकलेल्या भौगोलिक सीमारेषा व स्पर्धात्मक किमतीला वस्तू उपलब्ध करून देण्याची अस्तित्वात आणलेली नवी व्यवस्था होय. आता या सर्व ऑनलाइन गोष्टींमध्ये शिकणेही आता डिजिटल होऊ लागले आहे. शिक्षणाची ही नवी व्यवस्था अद्यापही अंगवळणी पडलेली नसली, तरी ती आता अपरिहार्य आहे. त्यामुळे तिच्याबद्दल सर्वच बाजूने विचार व्हायला हवा.