ओळखा पाहू
(१) आठ खात्याचे मंडळ -
(२) बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते -
(३) महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग -
(४) किल्ल्यावर युद्धसाहित्याची व्यवस्था पाहणारा -
Answers
(१) आठ खात्याचे मंडळ - आठ खात्याचे मंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळ होय.
अ) राज्य अभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती.
ब) राज्याचा निरनिराळ्या कामांसाठी त्यांनी मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली होती.
(२) बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते -बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.
अ) छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईक यांची नेमणूक गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून केली होती.
ब) त्यांनी महाराजांना अफझलखान आणि शाइस्ता खान याला पराभूत करण्यात मदत केली होती.
(३) महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग - महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला.
अ) सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थापना १६६५ मध्ये झाली होती. ब)सिंधुदुर्ग हे नावाचे निर्माण सिंधू अर्थात समुद्र आणि दुर्ग अर्थात गड/ किल्ला ह्यातून झाले आहे.
(४) किल्ल्यावर युद्धसाहित्याची व्यवस्था पाहणारा - किल्ल्यावर युद्धसाहित्याची व्यवस्था पाहणारा किल्लेदार असतो.
अ) किल्ल्याचे रक्षण करणारा व सर्व शास्त्रांचे देख रेख करणारा माणूस म्हणजे किल्लेदार होय.
ब) किल्लेदारासह काही मावळे सुद्धा गडावर पहारा देण्याकरता असतात.