onam festival info in marathi small
Answers
Onam festival is celebrated in the month Chingam, of the Malayalees' calendar. This festival reminds and commemorates one of the avatars of Lord Vishnu – Vamana Avatar. On this day, people also wait for the home coming of the great King Mahabali. The period in which he ruled is considered a golden period in Kerala
ओणम सण मलयालींच्या दिनदर्शिकेतील चिंगम महिन्यात साजरा केला जातो. हा उत्सव भगवान विष्णू - वामन अवतारातील एका अवतारची आठवण करून देतो आणि त्याचे स्मरण करतो. या दिवशी, लोक महान राजा महाबलीच्या घरी येण्याची देखील प्रतीक्षा करतात. ज्या काळात त्यांनी राज्य केले तो काळ केरळमधील सुवर्णकाळ मानला जातो
Answer:
मुंबईत स्वप्नातलं घर पाहताय? हीच आहे योग्य वेळ
ओणम साजरा करण्यामागे अनेक मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यातील बळी राजा प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी येतो, अशीही एक मान्यता असल्याने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यामागे एक आख्यायिक सांगितली जाते. बळी राजाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून हा उत्सव साजरा करतात. यावेळी पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. या उत्सवासाठीचे खास पारंपरिक पद्धतीचे अनेक खाद्यपदार्थही तयार केले जातात.
१६५ वर्षांनी अद्भूत योग : पितृपक्ष व नवरात्रात महिन्याचे अंतर; वाचा
वामनाचे बळीराजाला वरदान
श्रीविष्णूंनी वामनावतार धारण करत एका पावलामध्ये बळीराजाला पातळात ढकलले, ही कथा सर्वश्रुत आहे. मात्र, बळीची वचननिष्ठा पाहून वामनाने त्यास वरदान मागण्यास सांगितले. त्यानुसार बळीराजाने वर्षातून एकदा आपल्या राज्यात येऊन प्रजेला भेटण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हापासून बळी राजा आपल्या प्रजेला भेटण्यास दरवर्षी येतो, असे मानले जाते. राजाने वचनपूर्तीसाठी आपले प्राणही वामनाला दिले. त्याच्या अशा गुणांमुळेच तो लोकप्रिय राजा ठरला. ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह बळी राजाची मूर्तीचीही स्थापना घरोघरी केली जाते.
ओणम साजरा करण्याची पद्धत
ओणम सणासाठी घरांना रंग देऊन दर्शनी भाग फुलांनी सजवला जातो. घरासमोर बहुरंगी रांगोळी काढतात. दहा दिवसपर्यंत अशी पुष्पशोभा केल्यावर श्रवण नक्षत्राच्या मुख्य दिवशी वामनाची मृण्मय मूर्ती करून ती अंगणात बसवितात. प्रथम सर्व मिळून "आरप्पू" असा उद्घोष करत वामनाची पूजा करतात. उत्सवाच्या निमित्ताने केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकली किंवा काडुवकलीचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. ओनसद्या या पक्वान्नाशिवाय ओणमची सांगता होत नाही. तांदूळ आणि तांदळाचे विविध पदार्थ, डाळीची आमटी, पापड आणि तूप असा जेवणाचा बेत असतो. सांबार, ओलण, रसम, थोरन, अवियल, पचडी, विविध प्रकारची लोणची आणि मोरू म्हणजे ताक यांनाही फार महत्त्व आहे.
अवघ्या तीन पावलांमध्ये ब्रह्मांड व्यापून टाकणाऱ्या वामनाची जयंती
आताच्या घडीला ओणम हा केवळ केरळमध्ये नाही, तर देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इतकेच नव्हे, तर जागतिक पातळीवर असलेले केरळातील बांधव जिथे असतील, तेथे हा सण अगदी मोठ्या प्रमाणात साजरा करतात.