औक्षण व हिरवेगार झाडासारखं
1) कवी /कवयित्री
2) कवितेचा विषय
3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा.
i) नाही मोठी मध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त
काय करावे कळेना नाही
कष्टाचे सामर्थ्य,
।।) पक्षी झाडाचे कोणीच नसतात
तरीही झाड त्यांचं असतं.
4) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश
(5) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे..
Answers
Answer:
(१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री:
इंदिरा संत
(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
सीमेवर लढायला जाण्यासाठी सज्ज झालेल्या जवानाचे औक्षण करताना मनात येणाऱ्या भावनांचे वर्णन केले आहे.
(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ:
नाही मुठीमध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावे कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य
कवयित्रिला खंत आहे की तिच्याकडे धनदौलत नाही. देशाला समर्पित करण्याचे बळ नाही. अंगात, शिरेत रक्त नाही. शारीरिक, आर्थिक सामर्थ्य नाही, पण हा जवान शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यासह देशाच्या सेवेस जात आहे, याचा तिला सार्थ अभिमान आहे.
(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः
देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक नेहमीच देशासाठी भूषण असतात. जीवावर उदार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात. त्यांचे कुटुंब, मुले-बाळे यांना ते महिनोंमहिने भेटतही नाहीत. त्यांच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. सण, उत्सव साजरे करू शकतात. अशा या सैनिकांच्या पाठिशी आपण भक्कपणे उभे राहिले पाहिजे. तसेच त्यांचा आदर, कौतुक करून त्यांच्या कार्याचा आपण नेहमीच अभिमान बाळगला पाहिजे, असा संदेश आपल्याला मिळतो.