P
Date
Page
पानकासाठी तुमच्या शाळेच्या बक्षीस
समारंभाचे निमंत्रण पत्र तयार करा
Answers
Answered by
1
म. टा. वृत्तसेवा, पालघर
डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील पी. एल. श्रॉफ कॉलेजचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला साक्षी तामोरे आणि मयुरी गायकवाड या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रमिला राऊत यांनी कॉलेजच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊन कॉलेजचे सर्व विभाग, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी मागील वर्षात केलेल्या प्रमुख कामगिरीचा आढावा घेतला. हे कॉलेज ग्रामीण भागातील असूनही कॉलेजने केलेल्या आजवरच्या प्रगतीबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य सुचिता करवीर यांनी करून दिला. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कॉलेजच्या 'पुरुषोत्तम' या वार्षिक अंकाचे प्रकाशनही करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार पंकज राऊत यांनी सकारात्मकतेने परिसरातील चांगल्या-वाईट घटनांचा उहापोह करत यशस्वी व सक्षम नागरिक घडवण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक भान असणे ही काळाची गरज आहे, हा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यांनी अनेक आरोग्यदायी प्रकल्पांचा आढावा घेतला. वेळेचे महत्त्व विशद करून वस्तूंचे गुलाम होऊ नका, पत्रकार व शिक्षकच समाजाला वाचवू शकतात, असे मत व्यक्त केले. कॉलेजच्या सर्व शाखांमधील बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चिंचणी, तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या सदस्य डॉ. रमिलाबेन श्रॉफ, महेश पाटील, संस्थेचे विश्वस्त नंदकुमार कापडिया, चंद्रकांत कोठावदे, पियुष शहा, माजी सरपंच सुरेंद्र करवीर, सहामते, के. डी. हायस्कूलचे मुख्याध्यापक केरबा खंडाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विद्या दहिसरकर यांनी केले. आभार समन्वयक प्रा. रंजिता कपूर यांनी मानले.
Similar questions