पुढील चित्र पहा व त्यांचे महत्त्व सांगा
दांडी यात्रा
Answers
Answer:
mithacha साथ्यग्रह
Explanation:
mithacha साथ्यग्रह
please send clear pictures
भारतीयांना समुद्रातून मीठ तयार करण्याचा पूर्ण अधिकार असून त्याला पायबंद घालण्याचा कोणताही अधिकार ब्रिटिश सरकारला नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी दांडी हे ठिकाण निवडले. १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून इतिहासप्रसिद्ध दांडी यात्रा निघाली. त्यानुसार गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमातील ७८ स्त्री-पुरुष अनुयायांसह दांडी यात्रा सुरू केली. सरकारचा अन्यायकारक मिठाचा कायदा मोडण्यासाठी ही पदयात्रा होती. गांधीजींनी आधीच या पदयात्रेची माहिती व्हाइसरॉयला दिली होती. पण सुरुवातीला ब्रिटिशांना यात गांभीर्य वाटले नाही. तरीही गांधीजींनी आपले काम अखंडपणे चालू ठेवले. या पदयात्रेचे वाटेत असंख्य लोकांनी स्वागत केले आणि शेकडोंनी सत्याग्रहाच्या शपथा घेतल्या. ५ एप्रिल १९३० रोजी ही पदयात्रा दांडीला पोहोचली. ६ एप्रिलच्या पहाटे नेहमीची प्रार्थनासभा आटोपल्यानंतर गांधीजी व अनुयायी समुद्रकिनाऱ्याकडे चालत गेले. सकाळी ८.३० वा. तयार झालेले मूठभर मीठ उचलले आणि तेथे मिठाचा कायदा भंग केला. या घटनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. अनेक परदेशी पत्रकार/प्रतिनिधी हे अलौकिक दृश्य पाहण्यासाठी हजर होते. या घटनेने राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासात सर्वप्रथम अहिंसात्मक कायदेभंगाचा समारंभ साजरा झाला. कायदेभंग करणाऱ्या या साध्या सांकेतिक घटनेनंतर परकीय सरकारच्या कायद्यांना आव्हान देण्याची हिंमत भारतीय लोकांत संचारली. अन्यायकारक कायदे मोडण्यासाठी आणि स्वत:ला अटक करून घेण्यासाठी समाजातील विविध स्तरातील लाखो लोकांनी सर्वत्र आंदोलने सुरू केली. साऱ्या