पुढील पैकी एका विषयावर सुमारे दहा ओळी निबंध लिहा
माझा आवडता प्राणी
प्राण्याचे नाव व वर्णन
त्याच्याविषयीची
संवेदनशीलता
उपयोग
आवडण्याचे
खादय, राहण्याचे
ठिकाण
कारण
Answers
Answer:
प्रत्येकाला वाटते की माझ्या जवळ एक छानसा पाळीव प्राणी असायला हवा मुख्य म्हणजे पाळीव कुत्रा. खरं म्हटले तर कुत्रा सारखा पाळीव प्राणी इतर कुणी नाही कारण ते त्याच्या अंगी असलेले गुण पाहून मानव देखील लाजेल.
वफादार आणि इमानदार हा शब्द ऐकताच आपल्या मनात सर्वात आधी प्राण्यांचा विचार येतो आणि मुख्य तर कुत्र्याचा, ते म्हणतात ना वफादारी शिकावी तर कुत्र्याकडून. कुत्रा हा खूप प्रेमळ आणि जिवलग मित्र सारखा प्राणी असतो. तो त्याच्या मालकाविषयी निष्ठावंत आणि प्रेमळ असतो कारण त्याच्या मनात धोका, फसवणूक नावाचा शब्दच नसतो.
माझ्याकडे सुद्धा एक कुत्रा आहे आणि आमच्या घरात कुणीच त्याला कुत्रा म्हणून हाक मारत नाही कारण तो आमच्या घरातील एका सदस्य प्रमाणे आहे. मी त्याला माझा मित्र मानतो आणि मी त्याचे नाव रॉकी असे ठेवले आहे. कारण तो दिसायला खूप सुंदर आणि डॅशिंग आहे म्हणून.
माझा कुत्रा डोबरमॅन जातीचा आहे, ह्या जातीतील कुत्र्यांची शेपूट नसते, त्यांचे कान उभे असतात, जास्त करून ते लाल आणि काळया रंगात आढळतात आणि ते खूप चंचल असतात.
रॉकी ची गोष्टच वेगळी आहे कारण तो आमच्या घरातील सर्वांचा लाडका आहे. त्याची आणि माझी खूप चांगली मैत्री आहे आणि तो माझे सर्व काही ऐकतो. तो खूप हुशार आहे, आपण बोललेले त्याला सर्व समजते. जर मी त्याला शेक हँड्स असे म्हटलो की लगेच तो आपल्या पुढील पायाचा पंजा माझ्या हातात देतो आणि अश्याप्रकरे हस्तांदोलन करतो. घरातील सर्वांचे तो काम ऐकतो त्यामुळे तो सर्वांचा लाडका आहे.
रॉकी माझ्यासोबत खूप खेळतो, त्याला रोज बाहेर खेळायला घेऊन जावे लागते. क्रिकेट हा खेळ त्याला खूप आवडतो, मी बॉल दूर फेकल्यावर लगेच धावत जाऊन बॉल आपल्या तोंडात पकडून परत माझ्या जवळ आणतो.
कुत्रा पाळणे सोपे काम नाही कारण माझ्या कुत्र्याची रोज निगा राखावी लागते जसे त्याची रोज अंघोळ करावी लागते, रोज त्याला जेवण द्यावे लागते, रोज त्याला बाहेर फिरायला न्यावे लागते आणि अजून खूप काळजी ठेवावी लागते. त्याला रोज सकाळ संध्याकाळ फिरायला न्यावे लागते आणि नाही नेले तर तो बळजबरीने घेऊन जातो.
असं नाही की तो फक्त डॉग फूड खातो तर तो आपल्यासारखे खाद्य सुद्धा खातो जसे पोळी चपाती, भात, भाकर, दूध पोळीचा काला, डाळ भात आणि इतर अजून काही.
रॉकी घरात असतो त्यामुळे आम्हाला कधीच बोर होत नाही कारण तो आमच्याशी मस्त्या करतो आणि सतत आमच्या जवळ येऊन बसतो. त्याला झोपण्यास देखील एक स्वतंत्र जागा केली आहे तरी तो कधी कधी माझ्या जवळ येऊन झोपून जातो.
तो आमच्या घरातील एक खंबीर सदस्य आहे कारण तो जेवढा प्रेमळ आहे तेवढाच तो कठोर देखील आहे. रात्री तो आमच्या घराचे रक्षण करतो आणि चोर भुरटे यांना जवळ येऊ देत नाही. तो असल्यामुळे आम्ही निवांत झोपतो कारण आमच्या इथे त्याला सर्वजण घाबरतात.
आमचा रॉकी माझा खूप साऱ्या मित्रांना ओळखतो त्यामुळे तेही त्याच्याशी खेळतात आणि त्यांना तो खूप आवडतो. माझे मित्र घरी आले की त्याला खूप मज्जा वाटते आणि तो सतत आमच्यात येऊन बसतो आणि खूप मस्ती करतो.