पुढील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
नवल वाटणे-
Answers
Answered by
3
Answer:
नवल वाटणे
अर्थ- आश्चर्य वाटणे.
Explanation:
वाक्यात उपयोग-
१. शहरातील उंच इमारती पाहून रामला नवल वाटले.
२. समाजातील स्वार्थी लोकांना बघून राजेशला नवल वाटले.
३. वैद्यकीय क्षेत्रातील होणाऱ्या काळाबाजारामुळे सर्वसामान्यांना नवल वाटले.
४. एक शिक्षक असूनही विद्यार्थ्यांशी असे वागू शकतो हे पाहून पालकांना नवल वाटले.
५. नवीन आलेल्या सुनेला लगेच त्रास देणाऱ्या सासू कडे बघून सुनेच्या माहेरच्यांना नवल वाटले.
वरील विधानांवरून असे स्पष्ट होते की ज्यावेळी एखादी गोष्टीची अपेक्षा नसते व ती गोष्ट घडते, त्यावेळेस व्यक्तीला नवल वाटते म्हणजेच आश्चर्याचा धक्का बसतो.
Similar questions