Geography, asked by rohitzalte2062005, 5 months ago

पुढिल वीधाने चुक की बरोबर ते लिहा. चुकिची विधाने दुरुस्त करुन लिहा.
1).अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रबाळ बेटे ​

Answers

Answered by sunakat483
1

Answer:

लक्षद्वीप : (लखदीव). भारताचा केंद्रशासित प्रदेश व अरबी समुद्रातील एक द्वीपसमूह. ८० ते १२० १३’ उ.अक्षांश आणि ७१० ते ७४० पू. रेखांश यांदरम्यान याचा विस्तार आहे. या द्वीपसमूहात २० प्रवाळ बेटांचा समावेश असून त्यांत १२ कंकणद्वीपे, ३ प्रवाळशैलभित्ती व ५ निमज्जित किनारपट्ट्या आहेत. सर्व बेटांचे एकूण क्षेत्रफळ ३२ चौ.किमी असून ॲन्ड्रोथ (क्षेत्रफळ ४.८ चौ.किमी.-लोकसंख्या ६,८१२-१९८१), अमिनी (२.६-५,३६७), अगत्ती (२.७-४,१११), बित्रा (०.१-१८१), चेटलट (१.०-१,४८४), काडमट (३.१-३,११४), काल्पेनी (२.३-३,५४३), काव्हारट्टी (३.६-६,६०४), किल्टन (१.६-२,३७५) व मिनिकॉय (४.४-६, ६५८) या प्रमुख दहा बेटांवरची एकूण लोकसंख्या ४०,२४९ होती (१९८१). सर्वात कमी लोकसंख्या बित्रा या बेटावर असून कोणत्याही बेटाची रुंदी २ किमी.पेक्षा अधिक नाही. केरळ राज्यातील कोचीन शहरापासून लक्षद्वीप बेटे सु. २२० ते ४४० किमी. अंतरावर आहेत. काव्हारट्टी हे या प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : देशातील या सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशाचा भूभाग कमी असला, तरी याला ४,२०० चौ. किमी.चे खाजणक्षेत्र, २०,००० चौ.किमी.चे जलक्षेत्र व ७ लाख चौ.किमी.चे आर्थिक क्षेत्र लाभलेले आहे. कोणत्याही बेटाची सस.पासूनची उंची १० मी.पेक्षा अधिक नाही. पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पुढील सु. पन्नास ते शंभर वर्षांच्या कालावधीत लक्षद्वीप बेटे पाण्याखाली बुडतील, असा अंदाज राष्ट्रीय महासागरविज्ञान संस्थेने व्यक्त केला आहे. या बेटांवर कोणतीही पर्वतश्रेणी नाही किंवा कोणतीही नदी वाहत नाही.

हवामान : लक्षद्वीप बेटांवरील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६० सेंमी. असून दोन्हीही मॉन्सूनचा पाऊस येथे पडतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यांत कडक उन्हाळा जाणवतो. नारळ, केळी, अळू, शेवगा, विलायती फणस, फणस व रानटी बदाम ह्या वनस्पती या प्रदेशात आढळतात. पुळणींच्या जवळ थैस्सिआ हेंप्रिचीन व साइमॉड्सीए आयसोएटीफोलिया असे दोन भिन्न प्रकारांचे सागरगवत आढळते. सागरामुळे होणारे क्षरण व पुळणींवर होणारे गाळाचे संचयन यांवर या गवतामुळे मर्यादा घातल्या गेल्या आहेत. लक्षद्वीपमध्ये सागरी प्राणिजीवन समृद्ध आहे. भूभागावर गुरेढोरे व पाळीव खाद्यपक्षी आढळतात. सामान्यपणे आढळणारे थराथसी (स्टर्ना फुस्काटा) व कारिफेटू (ॲनवस स्टॉलिड्स) हे समुद्रपक्षी आहेत. पक्षी अभयारण्य म्हणूनच हे बेट घोषित करण्यात आलेले आहे.

इतिहास : स्थानिक दंतकथांनुसार केरळचा अखेरचा राजा चेरमान पेरुमाल याच्या कारकीर्दीत या बेटांवरील पहिली वसाहत झाली असावी. काही अरब व्यापाऱ्यांच्या हुकुमावरून जेव्हा राजाला इस्लामधर्म स्वीकारावयास लावण्यात आला, तेव्हा राजधानी क्रंगनोर (सांप्रतचे कोडुंगलूर) मधून त्याने मक्केला जाण्याच्या निमित्ताने पलायन केले. त्याच्या शोधार्थ किनाऱ्यावरील अनेक ठिकाणांवरून मक्केकडे जाणाऱ्या खलाशी बोटी सोडण्यात आल्या. त्यांपैकी कननोरच्या राजाची बोट तीव्र वादळात सापडून फुटली. तेव्हा अरबी समुद्रातच काही दिवस काढल्यानंतर शेवटी राजा व त्याच्याबरोबरील लोक एका बेटावर आले, ते बेट म्हणजेच ‘बंगारम बेट’ असल्याचे मानतात. त्यानंतर ते जवळच्या अगत्ती बेटावर आले. शेवटी वातावरण निवळल्यानंतर वाटेतील वेगवेगळ्या बेटांवर थांबत थांबत ते मुख्य भूमीवर आले. हा राजा परतल्यावर खलाशी आणि सैनिकांची दुसरी तुकडी अरबी समुद्रात पाठविण्यात आली. तेव्हा त्यांनी अमिनी बेटाचा शोध लावून तेथे ते राहू लागले. या पथकामध्ये पाठविलेले लोक हिंदू होते. आज जरी या बेटांवर इस्लामचे प्रभुत्व स्पष्टपणे दिसत असले, तरी अजूनही हिंदूंच्या काही सामाजिक परंपरा या लोकांमध्ये पहावयास मिळतात. अमिनी, काव्हारट्टी, ॲन्ड्रोथ व काल्पेनी या बेटांवर प्रथम लहान लहान वसाहती स्थापन झाल्या व त्यानंतर या बेटांवरील लोकांनी अगत्ती, किल्टन, चेटलट व काडमट या बेटांवर स्थलांतर केले.

ओबेदुल्ला या अरबी फकिराने येथे इस्लामवर प्रवचने केल्याचे सांगितले जाते. ॲन्ड्रोथ बेटावर ओबेदुल्लाची कबर असून आज ते एक पवित्र स्थळ मानले जाते. श्रीलंका, मलेशिया आणि ब्रह्मदेशातहीॲन्ड्रोथच्या धर्मोपदेशकांचा आदर केला जातो.

पोर्तुगीजांचे भारतात सोळाव्या शतकात आगमन झाल्यावर समुद्रपर्यटकांच्या दृष्टीने लखदीवला विशेष महत्त्व आले. जहाजांसाठी काथ्याच्या दोरखंडांना खूप मागणी होती, त्यासाठी बेटांवरील जहाजांची लूट करण्यास पोर्तुगीजांनी सुरुवात केली. नारळाचा काथ्या मिळविण्यासाठी पोर्तुगीज लोक काही वेळा जबरदस्तीने अमिनी बेटावर उतरत, परंतु बेटावरील लोकांनी या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विष घालून मारले. अशा रीतीने पोर्तुगीजांच्या अतिक्रमणाचा शेवट करण्यात आला.

पोर्तुगीजांचे भारतात सोळाव्या शतकात आगमन झाल्यावर समुद्रपर्यटकांच्या दृष्टीने लखदीवला विशेष महत्त्व आले. जहाजांसाठी काथ्याच्या दोरखंडांना खूप मागणी होती, त्यासाठी बेटांवरील जहाजांची लूट करण्यास पोर्तुगीजांनी सुरुवात केली. नारळाचा काथ्या मिळविण्यासाठी पोर्तुगीज लोक काही वेळा जबरदस्तीने अमिनी बेटावर उतरत, परंतु बेटावरील लोकांनी या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विष घालून मारले. अशा रीतीने पोर्तुगीजांच्या अतिक्रमणाचा शेवट करण्यात आला.

.

Similar questions