पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.
anju2730:
ha
Answers
Answered by
17
Answer:
दिलेले विधान बरोबर आहे
रोज आपल्याला कुठल्या न कुठल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल ऐकायला मिळते.दहशतवादी हल्ले लोकांच्या मनात भीती निर्माण करतात.
दहशतवादी हल्ल्यांमुळे लोकांचे जीव तर जातातच पण त्याचबरोबर मालमत्तेचा सुद्धा नुकसान होतो.रेल्वे स्टेशन,बस स्टेशन,विमानतळ,बाजार अशा सार्वजनिक ठिकाणी मुख्यतः दहशतवादी हल्ले होतात.त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या सुरक्षिततेबद्दल भीती निर्माण होते.त्यामुळे लोक कुठे जायच्या अगोदर घाबरतात,याचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होतो.
दहशतवादी हल्ले होत असलेल्या जागांवर पर्यटकांचे प्रमाण कमी होते,त्यामुळे पर्यटनावर परिणाम होतो.
या सगळ्या कारणांमुळे दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.
Explanation:
Similar questions