'पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.
(२) हिंदू व मुस्लीम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण
झाला.
(३) भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला
नाही.
Answers
Answer:
१) इंग्रजांनी १८०३ मध्ये ओडिशा जिंकून घेतला. येथे असणाऱ्या पाइकांच्या वंशपरंपरागत जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या . मिठाच्या किंमतीत वाढ केल्यामुळे सामान्य जनते प्रमाणे पाइकांचेही जीवनही असह्य झाले म्हणून त्यांनी सशस्त्र उठाव केला.
Answer:
(१) इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.
⇒ पाईक मध्ययुगीन काळातील ओरिसातील अस्तित्वात असलेली पद्धती. पाईक म्हणजे तिथे अस्तित्वात असलेल्या स्वतंत्र राजाचे खडे सैनिक. राजा आपापल्या पाईकांना जमिनी कसण्यास देत यावर त्यांचा उदरनिर्वाह होत असे. अज्ञात जेव्हा युद्ध परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस लढायला उभे राहावे लागे.
इ.स. 1803 मध्ये इंग्रजांनी ओडीसा ताब्यात घेतल्यानंतर तेथील पाईक यांच्या जमिनी हस्तगत केल्या . यामुळे पाईकांच्या उदरनिर्वाह करण्याचे साधन इंग्रजांनी बळकविल्या मुळे पाईक इंग्रजांवर संतापले. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीमध्ये वाढ झाली याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ लागला यामुळेदेखील पाईक इंग्रजांवर चिडले.
____________________________
(२) हिंदू व मुस्लीम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
⇒ ईस्ट इंडिया कंपनी मध्ये असणारे भारतीय कंपनीमध्ये असणारे भारतीय सैनिकांना येथील इंग्रजी अधिकारी तुच्छतेने वागवत असे. इंग्रजी अधिकाऱ्यांच्या तुलनेने यांना पगार कमी दिला जात असे. भारतीय सैनिकांना मोठे पद कधीच दिले जात नसे.
अजून महत्त्वाचे कारण म्हणजे, ब्रिटिशांनी 1856 साली लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका सैनिकांना दिल्या. वापरण्यात येणारी काडतुसे जी दातानी तोडावी लागत असे. त्या काडतुसाच्या आवरणार डुकराची चरबी आणि गाईची चरबी अशी बातमी सर्वत्र पसरली. हिंदूंना गाय पवित्र तर मुस्लिमांना डुक्कर निषिद्ध या कारणामुळे हिंदू मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष पसरला .
____________________________
(३) भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही.
⇒ लढ्याचा प्रसार सर्वत्र ठिकाणी झाला नाही,
लढ्यामध्ये इंग्रजांविरुद्ध नेतृत्वाची कमी
या लढ्यामध्ये योग्य ते लष्करी डावपेच यांची कमतरता, शस्त्रास्त्रांची कमी, आर्थिक पाठबळ याचा तुटवडा इत्यादी कारणांमुळे भारतीय सैनिकांचा इंग्रजांपुढे निभाव लागला नाही.