Math, asked by malimrunali2112, 6 months ago

पुढे दिलेली अपूर्ण कथा पूर्ण करा. अति तेथे माती.
मोहनचा कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय होता.एके दिवशी एका कोंबडीने सोन्याचे अंडे दिले व.............

Answers

Answered by varadad25
19

Answer:

अति तिथे माती

Explanation:

मोहनचा कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय होता. एके दिवशी एका कोंबडीने सोन्याचे अंडे दिले व मोहनच्या चेहर्‍यावरचा रंगच उडाला. तो इतका आवाक झाला की त्याला ते स्वप्नच वाटू लागले. पण, ते स्वप्न नव्हते तर हकीकत होती! तो सर्व घरच्यांना हे सांगू लागला. कोणाचाच यावर विश्वास बसेना. मात्र, जेव्हा मोहनने ती सोन्याचे अंडे देणारी कोंबडी घरच्यांना दाखवली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मोहनची आई त्याला म्हणाली, “पोरा, आता तर आपलं सारं संकट दूर व्हईल. आता आपण बी पैशावाले बनतोल.” आई चे हे विधान ऐकून मोहनचा आनंद गगनात मावेना.

दुसर्‍याच दिवशी मोहनने ठरवले की ते सोन्याचे अंडे लगेचच सोनाराकडे जाऊन विकायचे आणि पैसे कमवायचे. जेव्हा तो ते सोन्याचे अंडे पिशवीत घेऊ लागला, तेव्हा त्याला वाटले की आपल्याकडे आता तर फक्त चारच अंडे आहेत. थोडे दिवस आणखी वाट पाहिली तर चार चे आठ, आठ चे सोळा आणि सोळा चे बत्तीस सोन्याचे अंडे होतील. मग तर आपण सर्वांत श्रीमंत होऊ. या विचाराने मोहनच्या मनात घर केले. त्याला आता त्या सोन्याच्या अंड्यांशिवाय दुसरे काहीच सुचेना. त्याने अंडे विकण्याचा व्यवसायही जवळजवळ बंदच केला.

काही दिवस उलटले. आणि मोहनचे आयुष्य हादरावून टाकणाराच दिवस उजाडला. सोन्याचे अंडे देणारी ती कोंबडी मोहन आणि त्याच्या श्रीमंतीच्या स्वप्नांना अंधारात ढकलून सोडून गेली. मोहन स्वतःला सावरूच शकला नाही. त्याने क्षणाचाही विलंब न करता सोन्याचे अंडे बघण्यासाठी त्यांच्याकडे गेला. तिथे जाताच त्याला दुसरा धक्का बसला. सर्व सोन्याचे अंडे पांढरे झाले होते. त्यांचे सोने जसे आपोआप आले होते, तसेच आपोआप गायब झाले. मोहन आता कपाळावर हात ठेवून बसला होता. तेवढ्यात त्याची आई आली आणि म्हणाली, “पोरा, जर तू ते चार अंडे लवकर विकले असतेस, तर आज तुला कपाळावर हात मारून घेण्याची वेळ नसती आली.” आईच्या या वाक्याने मोहनचे डोळे उघडले. त्याला समजले की कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नये. अती केले की मातीच होते.

मोहनने पुन्हा जोमाने आपला कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय चालू केला. तो आता प्रामाणिक प्रयत्न करत होता. आणि त्याच्या चेहर्‍यावरचे सुख जणू त्याच्या प्रयत्नांचे मिळालेले गोड फळच होते!


Anonymous: आपण खूप चांगले लिहिले आहे
varadad25: धन्यवाद!
Answered by Anonymous
240

Answer:

अति तेथे माती. :

  • मोहनचा कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय होता.एके दिवशी एका कोंबडीने सोन्याचे अंडे दिले व एका शेतक्यास कोंबडी होती, तो आहे, तो दररोज अंडी द्यायचा. त्या शेतक्याने विचार केला की मी हे कोंबडी कापली तर .

  • म्हणून मी एकत्र भरपूर अंडी घेऊ शकतो.

  • म्हणून त्याने एक दिवस कोंबडी कापली.

  • कापल्यानंतर, कोंबडा हाताने गेला आणि जो माणूस दररोज सोनेरी अंडी घेणार होता तो देखील गेला.

  • याचा अर्थ असा की लोभाचे फळ वाईट आहे, म्हणून लोभ बाळगू नका

उपदेश : कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा

Similar questions