पिंजरा से पक्षी चे आत्मकथा in Marathi
Answers
मित्रा मी पिंजऱ्यातला पोपट बोलतो आहे. मी या पिंजऱ्यात दुःखकष्टी जीवन जगत आहे. आता मला हे जीवन नकोसे झाले आहे. काय हे माझे भाग्य ! मला स्वप्नातदेखील असा विचार आला नाही की, मला पिंजऱ्यात बंदिस्त व्हावे लागेल. या पिंजऱ्यात मला मधुर फळे खायला मिळतात. घरातील सर्वजण माझा कौतुक करतात. पण मला पिंजऱ्यातून कोणीही बाहेर काढत नाही. आजही मला माझे पूर्वीचे स्वातंत्र्याचे दिवस आठवतात आणि असे हरवून गेलेले आनंदाचे क्षण परत माझ्या जीवनात कधी येणार, या विचाराने माझे मन व्याकुळ होते.
बालपणी मी किती सुखात होतो ! अतिशय निसर्गरम्य असे ते जंगल होते. त्या जंगलातील एका झाडावरील ढोलीत माझा जन्म झाला. त्या ढोलीतून मी प्रथम बाहेर पाहिले तेव्हा आसपासचे नयनरम्य देखावा पाहून मला किती आनंद झाला होता ! पुढे माझ्या पंखात बळ आल्यावर माझ्या आईवडिलांनी मला निळ्या आकाशात उडायला शिकविले. जंगलातील झाडांवर मी आईवडिलांसमवेत स्वछंद विहार करीत असे.कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर. दिवस उजाडला की मी बाहेर पडत असे. आईवडिलांबरोबर राहिल्यावर मी समवयस्क मित्रांबरोबर रामू लागलो. त्या वेळी तासन्तास जगातल्या सर्व दुःखांपासून दूर आकाशात फिरायचो. मी माझे पंख पसरवून अशी काही भरारी आकाशात घायचो जाणू काही मीच इथला ' राजा ' आहे. झाडांच्या डहाळ्यांवर खेळायचो, बगाडायचो. मधुर गाणी गायचो शेतातील धान्याच्या कणसातील दाणे टिपायचो. जंगलातील झाडांची फळ मनसोक्त खायचो. विशषतः पेरूच्या झाडांची ! मग हिरव्यागार झाडांच्या सानिध्यात गाढ झोपायचो. रात्रीच्या वेळी झोप आली नाही तर आकाशातील चंद्र व चांदण्या यांचा लपंडाव पाहत राहायचो. असे होते ते मस्त जीवन ! पण माझ्या वाट्याला फारच थोडे दिवस ते सुख आले.
एके दिवशी मी जमिनीवरील दाणे टिपत असताना कसा कोण जाणे माझा पाय जाळ्यात अडकला. मी ओरडू लागलो ; पण माझे सोबती माझ्या मदतीला न येता उडून गेले. मी फासेपारध्याचा हाती सापडलो. त्याच्याजवळ इतरही पुष्कळ पक्षी होते फासेपारड्याने मला एका श्रीमंत माणसाच्या हाती विकले. माझ्या सुंदरतेवर खुश होऊन त्या श्रीमंत माणसाने फासेपारड्याला भरपूर पैसे दिले.
Answer:
तुम्हाला आश्चर्य वाटेल की पिंजऱ्यामध्ये बंद असणारा एक पक्षी सुद्धा आपल्या जीवनाची कथा सांगण्यासाठी आतुर आहे! अरे मित्रा, मी कोणते निर्जीव खेळणे आहे का ? माझ्या शरीरामध्ये सुद्धा एक धडकणारे हृदय आहे. मी सुद्धा सुख आणि दु:ख अनुभव करू शकतो.
सैनिकाची आत्मकथा
माझा जन्म एका घनदाट अरण्यात झाला होता. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची. तिने मला दाणे खायला आणि उडायला शिकवले. मी आकाशात घेतलेली पहिली झेप मला अजूनही आठवते. यानंतर मी आकाशात माझ्या मित्रांसोबत खूप दूर-दूरवर उडू लागलो. झाडाच्या बारीक फांद्यांवर बसून मी वाऱ्याबरोबर झोके घायचो. माझ्या आवाजाने शांत असलेले आकाश घुमत असे. किती सुखी आणि आनंदी जीवन होते माझे! त्या दिवसांची आठवण आली की माझ्या डोळ्यांमध्ये लगेच पाणावतात.