पिंजऱ्यातील बंदिस्त पक्षाची आत्मकथा
Answers
मित्रा मी पिंजऱ्यातला पोपट बोलतो आहे. मी या पिंजऱ्यात दुःखकष्टी जीवन जगत आहे. आता मला हे जीवन नकोसे झाले आहे. काय हे माझे भाग्य ! मला स्वप्नातदेखील असा विचार आला नाही की, मला पिंजऱ्यात बंदिस्त व्हावे लागेल. या पिंजऱ्यात मला मधुर फळे खायला मिळतात. घरातील सर्वजण माझा कौतुक करतात. पण मला पिंजऱ्यातून कोणीही बाहेर काढत नाही. आजही मला माझे पूर्वीचे स्वातंत्र्याचे दिवस आठवतात आणि असे हरवून गेलेले आनंदाचे क्षण परत माझ्या जीवनात कधी येणार, या विचाराने माझे मन व्याकुळ होते.
बालपणी मी किती सुखात होतो ! अतिशय निसर्गरम्य असे ते जंगल होते. त्या जंगलातील एका झाडावरील ढोलीत माझा जन्म झाला. त्या ढोलीतून मी प्रथम बाहेर पाहिले तेव्हा आसपासचे नयनरम्य देखावा पाहून मला किती आनंद झाला होता ! पुढे माझ्या पंखात बळ आल्यावर माझ्या आईवडिलांनी मला निळ्या आकाशात उडायला शिकविले. जंगलातील झाडांवर मी आईवडिलांसमवेत स्वछंद विहार करीत असे.कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर. दिवस उजाडला की मी बाहेर पडत असे. आईवडिलांबरोबर राहिल्यावर मी समवयस्क मित्रांबरोबर रामू लागलो. त्या वेळी तासन्तास जगातल्या सर्व दुःखांपासून दूर आकाशात फिरायचो. मी माझे पंख पसरवून अशी काही भरारी आकाशात घायचो जाणू काही मीच इथला ' राजा ' आहे. झाडांच्या डहाळ्यांवर खेळायचो, बगाडायचो. मधुर गाणी गायचो शेतातील धान्याच्या कणसातील दाणे टिपायचो. जंगलातील झाडांची फळ मनसोक्त खायचो. विशषतः पेरूच्या झाडांची ! मग हिरव्यागार झाडांच्या सानिध्यात गाढ झोपायचो. रात्रीच्या वेळी झोप आली नाही तर आकाशातील चंद्र व चांदण्या यांचा लपंडाव पाहत राहायचो. असे होते ते मस्त जीवन ! पण माझ्या वाट्याला फारच थोडे दिवस ते सुख आले.
एके दिवशी मी जमिनीवरील दाणे टिपत असताना कसा कोण जाणे माझा पाय जाळ्यात अडकला. मी ओरडू लागलो ; पण माझे सोबती माझ्या मदतीला न येता उडून गेले. मी फासेपारध्याचा हाती सापडलो. त्याच्याजवळ इतरही पुष्कळ पक्षी होते फासेपारड्याने मला एका श्रीमंत माणसाच्या हाती विकले. माझ्या सुंदरतेवर खुश होऊन त्या श्रीमंत माणसाने फासेपारड्याला भरपूर पैसे दिले.
तेव्हा पासून मी गुलामगिरीचे जीवन जगतोय. माझ्या मालकाने मला सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त केले आहे त्याने दिलेली फळे गोड मानून खातो. लहान मुले मला खेळणं समझून माझ्या सभोवती घेराव घालतात आणि काही ना काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. स्वातंत्र्य हिरावून घेतलायचं दुःख त्यांना काय समजणार !
तरीपण लोकांना आनंद देण्यासाठी खोटं हास्य चेहऱ्यावर आणतो. मनात nastanahi इतरांना रामाविण्यासाठी मला शीळ घालावी लागते. माझ्या बंदिस्त जीवनाची व्यथा फक्त tech समझू शकतात, ज्यांनी असे बंदिस्त जीवन व्यतीत केले आहे येथे माझ्यापासून माझं आयुष्य हिरावून घातलं जात आहे. इतकेच नव्हे तर माझी भाषा ही हिरावून घेतली जात आहे. या घरातील व्यक्तींनी शिकवल्याप्रमाणे मी ' सुस्वागतम ', ' नमस्ते ', ' राम राम ', 'कृष्ण कृष्ण ', ' मिठू मिठू ' बोलतो. माझ्या मालकाला ' आत्माराम ' अशी हाक मारतो. हे खरं आहे, की घरातल्या सर्वाना प्रिय आहे, पण तुम्ही अशा प्रेमाला काय म्हणणार?... "
Answer:
ANSWER✏✏✏ :-
ATTACHED ABOVE⬆⬆⬆