पाखरांचा थवा केव्हा येतो
Answers
Explanation:
मला नही माहिती आहे
Explanation:
पाखरांना असं चंद्रवेड लागणं बरं नसतं. पण, तरल आश्विनातल्या स्निग्ध रात्रींमध्ये तसं होणं अपरिहार्यच असतं. अशा पाखरांचं रात्रभान सरतं. ते चढत्या चोचीनं चंद्र खुडून नेण्याची स्वप्नं बघत जागर करतं आणि मग त्याच्या जागराची गाणी होतात. मुकी पाखरंही मग ही गाणी गाता यावी म्हणून आभाळाकडे आर्तपणे कंठाची, सुरेल गळ्याची मागणी करतात. प्रकाशणार्या रात्रींच्या मोहात पडून पाखरांच्या पिढ्यान्पिढ्या गायला लागतात. पुढच्या मोसमात ही गाणी पुढच्या पिढीलाही कळावीत म्हणून झाडांच्या फांद्यांवर चोचीने गाण्याच्या नक्षी काढून ठेवतात. पायात चंद्रबळ शिरल्याने काही माणसंही सैरभैर होऊन याच वेळी गावाबाहेर पडली असतात. चंद्राला पान्हा फुटतो. प्रकाश पाझरू लागतो. रसिया माणसांचे तांडे मग भररात्री झाडाखाली मुक्काम ठोकतात. शेकोट्या पेटवून गाणी म्हणतात. ही गाणी त्यांना पाखरांच्या पूर्वीच्या पिढ्यांनी शिकविली असतात.