पोलिस आणि जनता निबंध
Answers
Answer:
:सरकारचे प्रतिनिधित्व करणार्या आणि नागरिकांसमोर सरकार म्हणून सर्वप्रथम दिसणारा घटक म्हणजे पोलीस आहे. सर्वसामान्यांची पोलिसांकडून काय अपेक्षा असते ,तर आपल्या जीवनाचे ,मालमत्तेचे आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे. त्यामुळे नागरिकांना आपल्या स्वातंत्र्याची जपणूक व्हावी असे वाटते तेव्हा तो कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणार्या घटकाकडे म्हणजे शासनाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असतो. मात्र अनेकदा पोलीस जनतेचा विश्वास संपादन करण्यास असमर्थ ठरतो आणि त्याचे पर्यवसान शेवटी संबंधात बाधा येते.
पोलीस जनता संबंध बिघडण्याचे कारण कोणते याचा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की समाजात पोलिसाकडे रक्षक म्हणून पाहिले जाते .परंतु बर्याचदा त्यांच्या कडक वागण्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत काहीशी नकारात्मक भावना निर्माण होऊ लागते .मात्र यामागे देखील काही कारणे आहेत .जसे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अधिक तास काम करावे लागते
Answer:
आपल्याला आयुष्यात वेळोवेळी पोलीस दिसत असतात. (भेटत नसतात याला आपण सुदैव मानतो.) त्यामुळे पोलीस हे कायम काहीतरी वाईट झालं तर भेटायची व्यक्ती असा आपला (गैर)समज असतो. खरंतर ते आपल्या सुव्यवस्थेसाठीच झटत असतात. पण तरीही दुर्दैवाने ते आपल्याला आपले वाटत नाहीत. का? याचा विचार करायची याहून योग्य वेळ नाही असं वाटलं आणि हा लेख लिहायला घेतला.
मुंबईत दोन मुलांनी डोक्यात बांबू मारला आणि त्यामुळे हवालदार शिंदे गेले. आज ते गेले म्हणून अख्खा महाराष्ट्र हळहळला. नेते मंडळींनी (मुख्यमंत्र्यांसकट) घरी गर्दी केली पण अशा दृश्य-अदृश्य काठय़ा हजारो पोलिसांच्या डोक्यावर वर्षांनुवर्षे बसतायत हे या भावनेच्या भरात आपण साफ विसरलो. कुणाला माफियांकडून, कुणाला राजकारण्यांकडून, कुणाला डिपार्टमेंटमधूनच. कुणाला निर्लज्ज जनतेकडून. आपल्या आजूबाजूचे असंख्य पोलीस या ठणकत्या जखमा घेऊनच वर्षांनुवर्षे डय़ूटी करत असू शकतील असा विचारही आपल्या मनाला कधी शिवत नाही.
विचार केला आणि जाणवलं, पोलिसांबद्दलची ही अनास्था आपल्या ‘कंडीशनिंग’मध्ये आहे. बालपणापासून ‘अमुक अमुक कर नाहीतर पोलीस काका येतील’ असं सांगितलं जातं, त्यामुळे पोलिसच मुलं उचलून घेऊन जातात असं वाटायला लागतं. त्यांच्याबद्दल आदराऐवजी धाक तयार होतो. कळत्या वयात, ज्याचा धाक वाटतोय ती ‘पोलीस’ नावाची व्यक्ती सिग्नलच्या कोपऱ्यात ‘शंभर-दोनशे’ रुपयांना मॅनेज होते हे कळतं आणि पोलीस म्हणजे ‘मॅनेज होणारा!’ यावर आपला ठाम विश्वास बसत.