पाणी टंचाई एक ज्वलंत समस्या
निबंध 100 120 शब्दात
i will me you brainlist
Answers
Explanation:
पाणी म्हणजे जीवन अन् जीवन म्हणजे पाणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काही दिवसांपूर्वीच आपण जागतिक जलदिन साजरा केला खरा; पण त्यातून काय बोध घेतला का हो? कडक उन्हाळ्यात कदाचित तो जागतिक जलदिन म्हणून महत्त्वाचा ठरलाही असेल, पण वर्षातील 8 महिने पाण्याची काळजी कोणाला नसते. किंबहुना पाणी बचत, पाणी टंचाई या विषयावर बोलायलासुद्धा वेळ नसतो.
उन्हाळ्याच्या झळा लागल्या की सर्वजण खडबडून जागे होतात. तहान लागली की विहीर खोदतात. दिवसेंदिवस कमी होणारे पर्जन्यमान, पाण्याचा तुटवडा, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणातील बदल, वाढती लोकसंख्या, कमी पडणारा पाणीसाठा, पाण्याचा अपव्यय अशा बर्याच गोष्टींमुळे पाणी टंचाई व दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा, शेततळी बंधारे व शेतात ठिबक सिंचन योजना या गोष्टींकडे जर माणूस वळला तर पाण्याचे योग्य नियोजन होऊ शकते. त्यासाठी फक्त एकजूट, कष्टाची तयारी हवी. तरच या दुष्काळ नावाच्या शापातून कायमची मुक्ती मिळू शकते.
पूर्वी धो-धो पाऊस पडत असल्याने तुडूंब भरून वाहणारे ओढे, नद्या, नाले, बंधारे, विहिरी यामध्येही भरपूर पाणीसाठा असे. मात्र सध्या हे चित्र बदलत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यावर काही गोष्टींची काळजी घेतल्यास ही पाणीटंचाई दूर होऊ शकते.पाण्याचा पुनर्वापर ही पण योजना गावागावात, घराघरात राबवली पाहिजे. एकदा वापरलेले पाणी फेकून न देता त्याचा योग्य पुनर्वापर केल्यास परसबागा फुलतील. सांडपाणी गटर, नाल्यात न सोडता शोषखड्ड्यात सोडले पाहिजे. वेस्टेज पाणी बागेतल्या झाडांना वापरावे.
पाणी बचतीचे प्रयोग अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच केले जात आहेत. भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी रायगड, प्रतापगडावर मोठ-मोठे हौद,चौथरे बांधून पाणीसाठ्याचे प्रयत्न केले आहेत. सध्याच्या जगात उन्मत व बेजबाबदार झालेल्या माणसाला कशाचीच फिकीर राहिली नाही. यांत्रिकतेचा प्रभाव वाढल्याने निर्जीव, पशुसारखे जीवन जगू लागलाय. त्यातून मानवाला बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. पाणी बचतीच्या योजना व प्रकल्पांमध्ये सहभागी झाले पाहिजे. तेव्हा उद्याची वाट पाहत उशीर करू नका. आजच या विचारांची कास धरा, राष्ट्रीय कार्यात व क्रांतीत भर टाकूयात.
जल जमाव एक ज्वलंत समस्या क्यों बन गई है, इस पर हमें एक निबंध लिखने की आवश्यकता है
पाणी टंचाई एक बड़ी समस्या बन गया है और पाणी टंचाई के कारण मुख्य समस्या मच्छरों का प्रजनन है। ये मच्छर हमें कई तरह की बीमारियों से संक्रमित करते हैं जो कि अगर वहां पानी जमा नहीं होता तो हमें नहीं होता।
पाणी टंचाई के कारण मिट्टी अपनी उर्वरता बनाए रखने में सक्षम नहीं है। मिट्टी का पीएच स्तर भी बदल जाएगा।इससे पौधों को बढ़ने में कठिनाई होती है। भारी वर्षा की स्थिति में यह समस्या और अधिक हो जाएगी।
इससे किसानों को नुकसान होगा। यह नुकसान निश्चित रूप से हमारी खाद्य आपूर्ति को भी प्रभावित करेगा।
PROJECT CODE: #SPJ3