प. ४. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. माणसाच्या बोलण्यावरून त्याचे शिक्षण संस्कृती व परंपरा इत्यादी सबंधी माहिती चटकन कळते. पशुपक्ष्याना बोलता येत नाही. एका विशिष्ट आवाजापलीकडे ते उच्चार करू शकत नाहीत. भाषा ही ईश्वराकडून माणसाला मिळालेली अपूर्व देणगी आहे. मनुष्य भाषा लिहू शकतो, बोलू शकतो. भाषेद्वारे तो आपने विचार व्यक्त करतो. गुरुत्वाकर्षणापेक्षा गोड बोलण्याचे आकर्षण मोठे आहे. मधुर शब्दांनी माणसे जवळ येतात. तर कटू शब्दानी दूर होतात. म्हणूनच, कोणाचाही द्वेष करू नका. शत्रूलाही पेमाने जिंका असा संतांनी उपदेश केला आहे. पश्न. १. माणसाच्या बोलण्यावरून त्यासंबंधी कोणती माहिती कळते ? (1) २. माणसाला ईश्वराकडून कोणती मोठी देणगी मिळाली आहे ? 11) ३. कशापेक्षा गोड बोलण्याचे आकर्षण मोठे आहे ?
Answers
Answered by
4
Answer:
★ पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
• प्रश्न (1). माणसाच्या बोलण्यावरून त्यासंबंधी कोणती माहिती कळते ?
⇒ माणसाच्या बोलण्यावरून त्या व्यक्तीचे शिक्षण, संस्कृती आणि परंपरा इत्यादी बद्दल माहिती अवगत होते.
__________________
• प्रश्न (2). माणसाला ईश्वराकडून कोणती मोठी देणगी मिळाली आहे ?
⇒ मानवास भाषा ही ईश्वराकडून मिळालेली अपूर्व देणगी अथवा भेट आहे असे म्हणता येईल.
__________________
• प्रश्न (3). कशापेक्षा गोड बोलण्याचे आकर्षण मोठे आहे ?
⇒ गुरुत्वाकर्षणापेक्षा गोड बोलण्याचे आकर्षण मोठे आहे.
म्हणजेच, गोड बोलण्याने अथवा मधुर शब्दांचा व्यवहारात उपयोग केला तर माणसे जवळ येतात. कटू शब्दांनी याच्या अगदी उलट होते.
Similar questions