प्र.1 अ) रामायणकालीन सामाजिक स्थिती स्वशब्दात लिहा.
Answers
Answer:
रामायणामध्ये २४,००० श्लोक असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत.[२] रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्नी सीतेचे रावणाकडून अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी (लव-कुश) प्रचार केला.[३]
नंतरच्या काळातील संस्कृत काव्यांच्या छंद रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान व कथेचा खलनायक रावण आदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो. प्रभावित कृतींमध्ये इ.स.च्या १६व्या शतकातील मराठी संत एकनाथ, हिंदी भाषा कवी तुलसीदास, इ.स.च्या १३व्या शतकातील तामिळ कवी कंब,[४] इ.स.च्या २०व्या शतकातील मराठी कवी गजानन दिगंबर माडगूळकर आदी प्रमुख होत.
रामायणाचा प्रभाव आठव्या शतकापासून भारतीय वसाहत असलेल्या आग्नेय आशियामधील इंडोनेशिया (जावा, सुमात्रा व बोर्नियो) थायलंड, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम व लाओस आदी देशांच्या साहित्य, शिल्पकला, नाटक या माध्यमांवरही पडलेला आढळतो.