प्र 1 आ) बातमी लेखन.
I
तुमच्या शाळेने काढलेल्या वृक्षदिंडी ची व वृक्षारोपणाची बातमी लिहा.
Answers
बातमी लेखन.
Explanation:
"शाळेच्या वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाची बातमी"
"न्यू इंग्लिश शाळेत वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहाने साजरा"
दिनांक : २६ जुलाई २०२१, शनिवार.
अमरावती: दिनांक २६ जुलाई २०२१ रोजी न्यू इंग्लिश शाळेत वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून गावाची सरपंच सौ. मीनाताई दिवेकर उपस्थित होत्या. त्यांनी 'वृक्ष - निसर्गाची मौल्यवान भेट' या विषयावर भाषण देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा घातलेले सर्व विद्यार्थी उपस्थित होते. वृक्षदिंडीची सुरुवात शाळेच्या मैदानातून झाली. या दिंडीत मुख्य अतिथी, शाळेचे मुख्याध्यापक व सगळ्या शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. दिंडी गावभर फिरली व पुन्हा मैदानात आली जिथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले. शाळेच्या आवारात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित सगळ्या मान्यवरांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांना तुळशीचे रोप दिले गेले आणि कार्यक्रम आनंदात पार पडला.