Math, asked by karanpole58, 5 days ago

प्र. 3 टिपा लिहा. (कोणतेही 2)
1) भारतातील काटेरी व झुडपी वने
2) भारतातील जनगणना
3) ब्राझीलमधील पश्चिमेकडे चला' धोरण.
प्र. 4 अ) दिलेल्या भारताच्या नकाशा-आराखड्यात
1) पुलिकत सरोवर
2)
3) हिमालयातील वने
4)
का
6)​

Answers

Answered by riyabante2005
5

1)➜ (१) भारतातील ज्या प्रदेशांत दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व ५०० मिमीपेक्षा कमी पर्जन्य होतो, अशा प्रदेशांत काटेरी व झुडपी वने आढळतात.

(२) भारतातील गुजरात व राजस्थान राज्यांत व राजस्थानमधील थरच्या वाळवंटी प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात.

(३) भारतातील काटेरी व झुडपी वनांमध्ये खैर , बाभूळ, खेजडी इत्यादी वनस्पती व कोरफड, घायपात इत्यादी निवडुंगाचे प्रकार आढळतात.

(४) बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी या वनांतील वनस्पतींची पाने आकाराने लहान असतात.

2)➜ (१) भारतात जनगणना कार्यालयाकडून दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते.

(२) भारतातील पहिले जनगणना सर्वेक्षण १८७२ साली झाले.

(३) भारताची जनगणना दशकारंभी होते. उदा., २००१, २०११.

(४) भारतात पुढील जनगणना २०२१ साली होईल.

3)➜(१) ब्राझीलमध्ये दक्षिण व आग्नेय भागांत, विविध औद्योगिक प्रदेशांत व 'सावो पावलो' या नव्याने विकसित झालेल्या महानगरात नागरीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

(२) देशातील पश्चिमेकडील भागांत व इतर भागांत नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

(३) देशातील विशिष्ट भागांत होणारी लोकसंख्येची वाढ व लोकवस्त्यांचे केंद्रीकरण टाळण्यासाठी ब्राझील सरकारने 'पश्चिमेकडे चला' या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे.

(४) या धोरणामुळे ब्राझीलमधील केवळ विशिष्ट भागांत होणाऱ्या नागरीकरणाचे प्रमाण कमी होईल. परिणामी लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होऊन देशातील लोकसंख्येच्या वितरणातील असमतोल कमी होईल.

4)➜ नाही आहे लक्ष्यात. Sorry

5) ➜(१) भारतात हिमालय पर्वतरांगांत वने आढळतात. या वनांना भारतातील हिमालयीन वने असे संबोधतात. भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे तीन प्रकार पडतात.

(२) हिमालयातील अतिउंच प्रदेशात हवामान अतिशय थंड असते. या प्रदेशात उन्हाळ्यात काही प्रमाणात बर्फ वितळते. त्यामुळे येथील - वनस्पतींना उन्हाळ्याच्या हंगामात रंगीबेरंगी फुले येतात.

(३) हिमालयातील मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फर अशा सूचिपर्णी वृक्षांची वने आढळतात. या वनांतील वृक्षांची पाने टोकदार व निमुळती असल्यामुळे या पानांवर पडणारे बर्फ पानांवरून खाली घसरते. (४) हिमालयातील कमी उंचीच्या म्हणजेच पायथ्यालगतच्या प्रदेशांतत वेध सूचिपर्णी व पानझडी वृक्ष अशी मिश्र वने आढळतात. या वनांमध्ये प्रामुख्याने साल वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात.

All the best for Exam's.

Similar questions