(*प्र* चे कोडे. पहा जमतेय का? खालील शब्दांना योग्य प्रतिशब्द शोधा. शब्दाची सुरुवात *प्र* पासून असावी
1घटना
2संसार
3पध्दत
4पहाट
5पराक्रम
6धबधबा
7ॐकार
8उजेड
9जगबुडी
10अनुभव
11जहाल/तीव्र
12सखोल
13पोहचवणे/पसरवणे
14रोगाची लागण
15चाबूक
16गणपतीचे नाव
17अल्हाददायक
18सुर्याचे नाव
19देशाटन
20उन्नती
21नागरिक
22वादल
23उद्देश/हेतु
24गमक
25अपराध
26आनंद
27हुशारी
28पणतु
29श्रृंगार
30तेजोवलय
31मार्गस्थ होणे
32त-हा
33कमल
34निसर्ग
35घाव
36माप
37लांबलचक/विस्तृत
38विरोध
39वर्गवारी
40पहिला
41परिणाम होणे
42रोज
43आग्रहाने सांगणे
44पहिली तिथी
45ऐसपैस
46देणे
47उलटून बोलणे
48कष्ट
49विशाल
50विश्वासघात
Answers
Answer:
Sorry I don't know the answer
प्रश्नांमध्ये दिलेल्या शब्दाची टक्केवारी खालीलप्रमाणे असेल. प्रत्येक शब्द 'प्र' या अक्षरापासून सुरू होतो ...
1. घटना ——► प्रसंग
2. संसार ——► प्रपंच
3. पध्द ——► प्रघात,प्रणाली
4. पहाट ——► प्रभात
5. पराक्र ——► प्रताप
6. धबधबा ——► प्रपात
7. ॐकार ——► प्रणव
8. उजेड ——► प्रकाश
9. जगबुडी ——► प्रलय
10. अनुभव ——► प्रचिती
11. जहाल/तीव्र ——► प्रखर
12. सखोल ——► प्रगल्भ
13. पोहचवणे/पसरवणे ——► प्रचार
14. रोगाची लागण ——► प्रसार
15. चाबूक ——► प्रतोद
16. गणपतीचे नाव ——► प्रथमेश
17. अल्हाददायक ——► प्रसन्न
18. सुर्याचे नाव ——► प्रभाकर
19. देशाटन ——► प्रवास
20. उन्नती ——► प्रगती
21. नागरिक ——► प्रजा
22. वादल ——► प्रभंजन
23. उद्देश/हेतु ——► प्रयोजन
24. गमक ——► प्रतिक
25. अपराध ——► प्रमाद
26. आनंद ——► प्रमोद
27. हुशारी ——► प्रतिभा, प्रज्ञा
28. पणतु ——► प्रपौत
29. श्रृंगार ——► प्रसाधन
30. तेजोवलय ——► प्रभावळ
31. मार्गस्थ होणे ——► प्रयाण
32. त ——► हा ——► प्रथा
33. कमल ——► प्रमोदिनी
34. निसर्ग ——► प्रकृती
35. घाव ——► प्रहार
36. माप ——► प्रमाण
37. लांबलचक/विस्तृत ——► प्रदीर्घ
38. विरोध ——► प्रतिबंध, प्रतिरोध
39. वर्गवारी ——► प्रतवारी
40. पहिला ——► प्रथम
41. परिणाम होणे ——► प्रतिसाद
42. रोज ——► प्रतिदिन,प्रत्यही
43. आग्रहाने सांगणे ——► प्रार्थना
44. पहिली तिथी ——► प्रतिपदा
45. ऐसपैस ——► प्रशस्त
46. देणे ——► प्रदान
47. उलटून बोलणे ——► प्रत्युत्तर
48. कष्ट ——► प्रयास
49. विशाल ——► प्रचंड
50. विश्वासघात ——► प्रतारणा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
इतर काही मनोरंजक कोडे....►
अशी कोणती वस्तू आहे जी समोरुन देवाने बनवली आहे अणि माघून मानसाने बनवली आहे?
https://brainly.in/question/5207438
═══════════════════════════════════════════
हे कोडे छान आहे.
या कोड्यात दोन अक्षरी शब्द दिलेला आहे . त्यात पहिले चौथे अक्षर घालून चार अक्षरी शब्द तयार करायचा आहे .
उदा.
यंत्र - नियंत्रण
बोध - प्रबोधन
१ योगी
२ वट
३ गाव
४ टांग
https://brainly.in/question/16709270