प्राचीन भारतीय स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता याचे उदाहरण कोण आहे
Answers
Answer:
स्त्रीशिक्षण, भारतातील : स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे स्त्रीशिक्षण होय. स्त्रीशिक्षण हा कोणत्याही समाजजीवनाच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा मापदंड आहे. कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, त्यावरून ठरते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी :वेदकाळ : भारतात वेदकाळी स्त्रियांना मान होता त्यांना मुलांच्या बरोबरीने आवश्यक असे शिक्षण मिळत असे व उपनयनाचा अधिकार होता. उपनयनानंतर त्यांच्या अध्ययनास सुरुवात होई. ब्रह्मवादिनी व सद्योद्वाहा असे विद्यार्थिनींचे दोन प्रकार होते. ब्रह्मवादिनी मुली आजन्म ब्रह्मचर्य पाळून वेदविद्येचा व ब्रह्मविद्येचा अभ्यास करीत. पठणाशिवाय स्वतंत्र लेखनही त्या करीत. लोपामुद्रा, विश्ववारा व घोषा या विदुषींनी रचलेल्या ऋचा ऋग्वेदा त आढळतात. ब्रह्मयज्ञाच्या वेळी केल्या जाणार्या तर्पणात सुलभा, मैत्रेयी, गार्गी व वाचक्नवी या विदुषी स्त्रियांचीही नावे आढळतात. याज्ञवल्क्य यांची पत्नी मैत्रेयी आत्म-ज्ञानविषयक जिज्ञासेबद्दल प्रसिद्ध होती. विदेह जनकाच्या राजसभेत जी आध्यात्मिक चर्चा चाले, तिच्यात गार्गी प्रमुख होती. तिने एका प्रसंगी याज्ञवल्क्यालाही वादात कुंठित केले होते. ब्रह्मवादिनी पुरुषांप्रमाणेच अध्यापनाचा व्यवसाय करीत. त्यांना उपाध्याया किंवा आचार्या अशी संज्ञा होती.
सद्योद्वाहा विद्यार्थिनी सोळाव्या वर्षापर्यंत शिक्षण घेऊन मग अनुरूप पतीशी विवाहित होत. गृहस्थाला पत्नीवाचून यज्ञाचा अधिकार नसे. यज्ञात पत्नीचा फार महत्त्वाचा वाटा असे. सामवेदातील ऋचा गाणे, यज्ञीय तांदूळ कुटणे, यज्ञीय पशूंना स्नान घालणे, यज्ञवेदीच्या विटा रचणे इ. कामे तिलाच करावी लागत. पती परगावी गेला असता पत्नीला यज्ञकर्म करण्याची परवानगी होती. सीतायज्ञ, रुद्रबल, रुद्रयाग यांसारखे यज्ञ फक्त स्त्रियांनीच करावयाचे असत. याचा अर्थ स्त्रीशिवाय गृहस्थाला गृहस्थपणच येत नसे. स्वतंत्र व सुबुद्ध स्त्रिया आपल्या अपत्यांच्या सर्वश्रेष्ठ गुरू समजल्या जात. हजार शिक्षकांपेक्षा पिता श्रेष्ठ गुरू व पित्यापेक्षा हजार पटींनी माता श्रेष्ठ गुरू समजावी, अशा अर्थाचे एक सुभाषित प्रसिद्ध आहे. वैदिक काळात सुरू झालेली स्त्रीशिक्षणाची उच्च परंपरा त्यानंतरच्या रामायण-महाभारत काळात टिकून होती. तसेच बौद्ध-जैन धर्मांच्या प्रारंभीच्या काळातसुद्धा स्त्रियांना शिक्षणाच्या क्षेत्रात मानाचे स्थान होते. सूत्रकालापर्यंत स्त्रियांची ही स्थिती होती मात्र त्यानंतर त्यांचा सामाजिक दर्जा खालावला आणि पुरुषवर्गाला जास्त महत्त्व प्राप्त झाले. स्त्रियांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लोप पावले. त्यांना यज्ञकर्म व वेदपठण यांबाबतीत अनधिकारी ठरविण्यात आले. सूत्रकालात वैदिक धर्माचे एकसूत्री व समानदर्शी स्वरूप नष्ट होऊन त्याला क्लिष्ट, उथळ व निव्वळ कर्मकांडाचे स्वरूप प्राप्त झाले.
Answer:
ieiekdkfkfkkdjsnsjejjrjennsanfge