१) प्रागतिक राष्ट्रवाद लोकांच्यामध्ये तेढ निर्माण करु शकतो.सहकारण स्पष्ट करा
Answers
राष्ट्र आणि राष्ट्रभूमी यांना आदर्श मानून त्यांवर निष्ठा ठेवणारी आधुनिक राजकीय विचारप्रणाली व त्यावर आधारलेला ध्येयवाद. एकोणिसाव्या शतकापासून यूरोपच्या इतिहासाला दिशा देणारी एक प्रमुख प्रेरणा म्हणून राष्ट्रवादाचा निर्देश करता येईल. हेच ऐतिहासिक कार्य राष्ट्रवादाने पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात आशिया खंडात आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आफ्रिका खंडात पार पाडले आहे.
एक राजकीय विचारप्रणाली या अर्थाने राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि एकता कायम राखणे, ही स्वयंसिद्ध नैतिक भूमिका होय. राष्ट्रीय स्वयंनिर्णयाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या हक्काचा पुरस्कार करणे, हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनेचे सामूहिक राष्ट्रीय रूप होय. उदारमतवादाचेच हे दोन भिन्न पातळ्यांवरील आविष्कार होत.
विकासोन्मुख आणि न्यायाधिष्ठित समाजरचना निर्माण करणे आणि जागतिक शांतता व सहकार्य साध्य करणे, ही उद्दिष्टे साध्य करावयाची असतील, तर व्यक्तिस्वातंत्र्यास पूरक असलेल्या राष्ट्रस्वातंत्र्याचा आग्रह धरावयास हवा, अशी उदारमतवादाची भूमिका आहे. जॉन स्ट्यूअर्ट मिल, जोसेफ मॅझिनी, वुड्रो विल्सन यांनी तिचे सातत्याने समर्थन केले; परंतु दोन महायुद्धांदरम्यानच्या कालखंडात राष्ट्रवादाची अतिरेकी, भ्रष्ट आणि विकृत कल्पना फॅसिझम आणि नाझीवाद यांच्या रूपाने फोफावली.