India Languages, asked by Srushti232005, 1 year ago


प्र.१. काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा.
(अ) भौगोलिक वैशिष्ट्ये (आ) प्राणिजीवन
प्र.२. प्राण्यांचे गंधज्ञान' या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
प्र.३. 'काझीरंगा ही कर्दमभूमी आहे', हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
प्र.५. 'तुम्ही केलेला जंगल प्रवास', याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
भाषाभ्यास
पीतममहापासून सामासिक शब्द तयार करा.​

Attachments:

Answers

Answered by muktar6433gmailcom
13

Answer:

नावाची उत्पत्ती -

Explanation:

काझीरंगा नावाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक आख्यायिका आहेत. एका आख्यायिकेप्रमाणे, रंगा नावाची एक मुलगी, जवळच्या कार्बी अँगलाँग जिल्ह्यातील काझी नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. पण त्यांच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. म्हणून ते दोघे कायमसाठी जंगलात पळून गेले. त्यांच्या नावांवरूनच या भागाला काझीरंगा असे नाव पडले.[२] दुसऱ्या आख्यायिकेप्रमाणे १६ व्या शतकातील वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांनी एका निपुत्रिक दांपत्यायावर (काझी व रंगा) कृपा केली व त्यांना त्या भागात एक मोठे तळे तयार करण्यास सांगितले. काझीरंगा नावाचे उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतात. १७ व्या शतकातील ॲहम राजा प्रतापसिंह जेव्हा या भागातून जात होता, तेव्हा त्याने खाल्लेले मासे हे काझीरंगातून आणल्याचे त्याला सांगण्यात आले होते.[३]

तरीही, काही स्थानिक लोकांच्या मते काझीरंगा हे नाव कार्बी भाषेतील काझीर-ए-रंग या शब्दातून तयार झाले. याचा अर्थ "काझीरांचे गाव" असा आहे. कार्बी लोकांमध्ये "काझीर" हे मुलीचे नाव मोठ्या प्रमाणात वापरले जाते,[४] व असे म्हणतात की पूर्वी "काझीर" नावाच्या एका स्त्रीने या भागावर राज्य केले. या भागात सापडणाऱ्या काही अवशेषांमुळे या तर्काला पुष्टी मिळते.

काझीरंगाचा अजून एक अर्थ लाल बकऱ्यांचे (हरणांचे) क्षेत्र असाही होऊ शकतो. कारण कार्बी भाषेमध्ये "काझी" चा अर्थ "बकरी" तर "रंगाई" चा अर्थ "लाल" असा आहे.[३]

Answered by gaurijadhav97
58

Answer:

I have answered this questions in pics you can see it

and I hope it will help you

Attachments:
Similar questions