प्र.५) खालील मुद्दयांच्या आधारे 'माझा आवडता खेळ' या विषयावर निबंध लिहा. (८ ते १० ओळी)
३) मैदानावर की घरात.
Answers
Explanation:
जगात सर्वात प्रख्यात आणि भारतातील लोकप्रिय असा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट असा एकमेव खेळ आहे, ज्याला लहान - मोठी मुले, वयस्कर आणि महिला, मुली सुद्धा पसंद करतात. क्रिकेट एक मैदानी खेळ आहे. हे तर आपल्याला माहीत आहे की, मनुष्याला सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक व्यायामाची गरज असते, शारीरिक व्यायामासाठी खेळा पेक्षा चांगलं अजून काही नाही होऊ शकत. क्रिकेट मधे शारीरिक व्यायाम तर आहेच आणि बुद्धी देखील वापरावी लागते.
क्रिकेट मॅच एक असा सामना आहे की तो एका व्यस्त माणसाला सुध्दा आपल्या कडे खेचतो. भारतात लगबग प्रत्येक गली- बोळात क्रिकेट खेळला जातो. खरं पाहता मला ही क्रिकेट जास्त आवडत नव्हते पण माझ्या मित्र आणि भावांसोबत खेळून खेळून मला पण क्रिकेट आवडायला लागला. पहिल्यांदा २००७ मधे मी क्रिकेट जागतिक सामने पाहिले, ते पाहून मला क्रिकेट चे बारकावे समजायला लागले आणि मी क्रिकेट च्यां खोल वर जाऊ लागलो आणि तो माझा सर्वात आवडता खेळ बनला. त्यानंतर आयपीएल ने तर अजूनच वेड लावले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे खेळ पाहून अजून मन तृप्त होत असे.