प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होत आहेत?
Answers
Answered by
10
पृथ्वीवर अस्तित्वात असणारी जैवविविधता सुरक्षित रहावी. यासाठी कोणत्या प्रजाती आजमितीला सुरक्षित आहेत व कोणत्या प्रजाती धोक्यात आहेत. हे शास्त्रीय निकश लावून नोंदण्याचे काम करण्याची प्रथा प्रथम ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कझर्वेशन ऑफ नेचर’ किंवा ‘आय.यू.सी.एन’ या संस्थेने १९६४ साली सुरू केली. त्यांनी एक नोंद वही प्रथम छापली व त्याला ‘रेड डाटा बुक’ असे नाव दिले. लाल रंग रक्ताचा किंवा धोक्याचा निर्देशक आहे, म्हणून हे नाव. यावर्षी ‘रेड डाटा बुक’ पन्नास वर्षांचे झाले आहे. जर पृथ्वीवर नांदणारी जैवविविधता सुरक्षित असता तर ‘रेड डाटा बुक’ प्रथम नामशेष झाले असते. दुर्दैवानं ‘रेड डाटा बुक’ मधे समाविष्ट असणार्या प्रजातींची संख्या दरवर्षी वाढतेच आहे, ही अत्यंत चिंताजनक वस्तुस्थिती आहे. या पुस्तकाचा आकार आज गलेलठ्ठ झाला आहे.
आज जगातील दहा टक्के पक्षी धोक्यात आहेत. गेल्या दशकात ज्या पक्षांच्या प्रजातींचा नव्याने शोध लागला. त्यांचाच विचार जर केला तर त्यातील २५ टक्के पक्षी धोक्यात आहेत, असे दिसते. ‘रेड डाटा बुक’ अंतर्गत वनस्पतींची नोंद देखील केली जाते आणि त्यांच्याबाबत तर परिस्थिती अधिकच भयावह आहे. ‘द आयरिश रेड डाटा बुक’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत क्रिस्टीन लिऑन या शास्त्रज्ञाने म्हटले आहे,
की ‘२0५0 सालापर्यंत पृथ्वीतलावरील दर चार किंवा पाच वनस्पती प्रजातींमागे एक प्रजाती नामशेष होईल व त्यांची संख्या साठ हजार असेल’ हा विध्वंस आज जिवंत असणारे आपल्यासारखे लोक पाहू शकतील; म्हणूनच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आपलीच आहे.
पाश्चिमात्य देशांमधील शहरात वास्तव्य करणारे उच्चभ्रू समाज सहज म्हणू शकतो (व म्हणतो देखील) ‘कशाला फिकिर करायची? पण भारतातील नागरिकाला किंवा इतर विकसनशील देशातील नागरिकांना वनस्पतींचे महत्त्व सहज पटते ते पाश्चिमात्य लोकांना लवकर रूचत नाही. वनस्पती आपल्याला अन्न पुरवतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका वगैरे गवताचे प्रकार आहेत. आपले कॉटनचे व रेशमी व इतर अनेक कपडे वनस्पतीजन्य आहेत. निवारा, औषधे, पेये असे व इतर सगळेच मनुष्यास आवश्यक किंवा आवडणारे पदार्थ वनस्पतींकडूनच घेतले जातात. स्वच्छ प्रदुषण मुक्त वातावरण व जिवनावश्यक प्राणवायू हे तर प्रमुख वनस्पती निर्मित घटक आणि कलावंतांना प्रज्ञा स्फुरवण्याचे काम, मनास शांती देण्याचे आवाहन वनस्पतीच पेलू शकतात. तरीही आपण वनस्पतींकडे दुर्लक्ष करतो. त्यांचे अस्तित्व आपण धरूनच चाललो आहोत. पण आज त्यांना प्रयत्नपूर्वक सांभाळण्याची वेळ आली आहे अथवा यापुढे वनस्पती आपला सांभाळ करू शकणार नाहीत.

35
★उत्तर - जंगलतोड , प्रदूषण, आपत्ती यामुळे पर्यावरणात बदल झाले.पर्यावरणात होत असलेल्या या बदलामुळॆ प्राणी आणि पक्षी यांचे नैसर्गिक वसतीस्थान नाहीसे होत आहेत.त्यामुळे त्याची राहण्याची गैरसोय झाली आहे.सतत वाढत असलेल्या नागरीकरणामुळे प्राणी व पक्षी यांच्या अन्न व निवारा या दोन्ही बाबी संकटात आल्या आहेत. याशिवाय काही जंगलामध्ये आजही शिकारी होत आहेत. अनेक प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions
Physics,
7 months ago
Math,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Physics,
1 year ago
Math,
1 year ago