(५) ‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Answers
"नमस्कार,
सदर प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'वीरांगना' या स्थूलवाचनातील आहे.
★ आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश -
उत्तर- या पाठात लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावनाशील वीरपत्नी ते एक सज्ज वीरांगना हा प्रवास वर्णन केला आहे.
पती संतोष महाडिक यांच्या वीरगती नंतर स्वाती खचून गेल्या नाहीत. त्यांनी पतीचे देशसेवेचे स्वप्न पुर्ण करण्याचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. भयंकर प्रयत्न करून सेनादलात लेफ्टनंट पदावरप्रवेश मिळवला. अमाप कष्ट घेतले. सगळ्या संकटांवर मत करून त्यांनी सैनिकत्व भूषवले. सगळ्या जगासमोर त्यांनी एक आदर्श ठेवला. परिस्थिती कोणतीही असो आत्मविश्वास आणि अथक परिश्रम घेणे यशाचे साधन आहे ते त्यांनी सिद्ध केले.
धन्यवाद..."
(५) ‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :- लेफ्टनंट स्वाती महाडिक या सर्वसाधारण भारतीय स्त्री असूनही त्यांची जीवन जगण्याची ढब व पती निधनानंतर पतींचे देशसेवा पूर्ण करण्याचे स्वप्न स्वतः पूर्ण करणे हे समाजासाठी मार्गदर्शक ठरले आहे. यश म्हणजे नक्की काय असते हे स्वातीजींच्या जीवन कार्याने समजते. निवडलेल्या दिशेने न घाबरता , त्यांनी ठामपणे पावले टाकली आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट घेणे म्हणजेच यश हे सर्वाना दाखवून दिले. एकदा निर्णय घेतल्यावर त्यांनी मागे वळून पहिले नाही. आपल्या अमुक गोष्टी नक्की करता येतील असा त्यांनी विश्वास बाळगला . कठोर परिश्रम घेतले . परिश्रमाबाबत कोणतीही तडजोड केली नाही . योजलेल्या मार्गावर त्या ठामपणे पावले टाकत राहिल्या त्यामुळे त्या यशापर्यंत पोहचल्या.