India Languages, asked by amitmassey3557, 1 year ago

(१) उतारा वाचून दिलेल्या कृती करा.
तक्ता पूर्ण करा.

जंगलाचा स्वभाव माणसाचा स्वभाव
(१) .................... (१) ....................
(२) .................... (२) ....................
जंगलाने सर्वांचे स्वागत केले-दिलखुलास, मनमोकळे. जंगलाचा स्वभावच असा मोकळाढाकळा असतो. अढी
धरावी, तेढ बाळगावी यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागतो. जंगलाला असा कोपरा नसतो. माणसं आणि त्यांची घरं
यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात. जंगल मनमोकळे असते. सहजसुंदर असते.
ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना, खेळताना, डुलताना, हसताना ते मनापासून
सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, भामरागडच्या जंगलाची वेश बदलण्याची वेळ, तर त्या
जंगलाने अंगाखांद्यावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही, की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू
नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुदूर सडा. राखाडी, पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा
सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊलवाटेने जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून चर्रचर्र आवाज उठायचा.
जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो
गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं, फांद्या, फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते. पावसाच्या सरी
झेलते. सचैल न्हाते. भिजत चिंब होऊन जाते.
-राजा मंगळवेढेकर.

Answers

Answered by Mandar17
53

"नमस्कार,

हा प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील अपठित उताऱ्यावर आहे. या उताऱ्यात जंगलाला मानवी भावना देऊन त्याची माणसाशी तुलना केली आहे. जंगल किती सहजपणे मानवी क्रिया करते हे आपल्याला या उताऱ्यात बघायला भेटते.


★ जंगलाचा स्वभाव -

(१) दिलखुलास

(२) मनमोकळा

(३) मोकळाढाकळा

(४) मनसोक्त, साहजिक


★ माणसाचा स्वभाव -

(१) अढी धरणारा

(२) तेढ बाळगणारा

(३) संकुचित

(४) संशय घेणारा


धन्यवाद..."

Answered by ksk6100
20

(१) उतारा वाचून दिलेल्या कृती करा.

तक्ता पूर्ण करा.

उत्तर:- खालीलप्रमाणे  

जंगलाचा स्वभाव                 माणसाचा स्वभाव

(१) मोकळाढाकळा        (१) मनात अढी धरतो,तेढ बाळगतो  

(२) मनसोक्त               (२) मनात सतत संकोच व संशय असतो.  

Similar questions