(६) ‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
Answers
"नमस्कार,
सदर प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'वीरांगना' या स्थूलवाचनातील आहे.
★ मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा -
उत्तर- आपण नेहमी संकट आली की खचून जातो. लढाई सोडून देतो. सगळे असताना सुध्दा आपण कष्ट घेण्यासाठी कचरतो. मार्ग बदलतो. परंतु आपण या गोष्टींमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. संपूर्ण कार्याचे नियोजन केले पाहिजे. हा नियोजनबद्ध प्रवासच आपल्या यशाचे साधन बनु शकते. सगळ्या गोष्टींचा टप्प्याने विचार करून अमलात आणले तर अवघड गोष्टीही सोप्या होऊ लागता. म्हणून आपण विसावा घेण्यापेक्षा नियोजनबद्ध प्रवास केला पाहिजे.
धन्यवाद..."
(६) ‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :-
प्रत्येक काम हे नयोजनबद्ध असेल तर यशाची शिडी चढण्यासाठी फार मदत होते, आपल्याला व्यवस्थितरीत्या यश संपादन करायचे असेल तर नयोजन करणे फार महत्वाचे आहे. काहीठिकाणी फार विपरीत परिस्थिती अनुभवायला मिळते. सर्वकाही असूनही नयोजन शून्य असल्यामुळे जे हवं आहे ते मिळत नाही. आपले ध्येय कोणते आहे हे निश्चित करून त्या वाटेवर जाण्याचे मार्ग शोधावेत व पूर्ण प्रयत्न करावे. फक्त मुक्कामाचा विचार ना करता नियोजनबद्ध प्रवसावर विश्वास ठेवावा.