Biology, asked by prafulnannaware81, 3 months ago

प्र.३. व्याख्या लिहा.
(१) मयूरासनाचे लाभ लिहा.
(२) योगाची सविस्तार व्याख्या करा.​

Answers

Answered by Anonymous
4

प्रश्न मयूरासनाचे लाभ लिहा.

उत्तर योगासनाचा एक प्रकार. मयूरासनात शरीररचनेचा आकृतिबंध मोरासारखा दिसतो म्हणून त्याला मयूरासन हे नाव आहे. हठप्रदीपिका व घेरण्डसंहिता या दोन्ही ग्रंथांमध्ये या आसनाचे वर्णन आढळते व या वर्णनात साम्य दिसून येते. शारीरिक क्षमता उच्चतम ठेवण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे.

लाभ : या आसनाचा अभ्यास केल्यामुळे पोटातील प्लीहा वगैरेंचे सर्व रोग लवकर नाहीसे होतात आणि अन्य दोष निर्माण होत नाहीत. जास्त खाल्लेले, न पचलेले अन्न तसेच अतिविषसुध्दा पचविण्याची क्षमता या आसनात आहे असे हठप्रदीपिकेत म्हटले आहे (१.३१). या आसनाने शरीरातील गाठ (गुल्म, टयुमर), नेहेमी येणारा ज्वर अशा प्रकारचे विकार बरे होतात तसेच कफ, वात, पित्त या दोषांचे योग्य संतुलन राखले जाते. मयूरासनात नाभीजवळ प्रचंड दाब पडतो. त्यामुळे रक्त छाती व डोक्याकडे वळते. आसन सोडले की पचनसंस्थेच्या अवयवांना वाढीव रक्ताभिसरणाचा फायदा होतो. जठराग्नी प्रदीप्त होतो. बध्दकोष्ठता दूर होते. पोटाचे स्नायू ढिले पडत नाहीत. तेथे मेद साठू शकत नसल्याने पोट सुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उत्साह दिवसभर टिकून राहतो. मनगटे, दंड, पाय व कंबर सशक्त होतात, प्रमाणशीर राहतात, आत्मविश्वास वाढतो.

प्रश्न योगाची सविस्तार व्याख्या करा.

उत्तर संतुलित पद्धतीने निहीत शक्ती सुधारणे किंवा विकसित करण्यासाठी योग हे एक अनुशासन आहे. योग आत्म प्रचीती प्राप्त करण्यास अर्थ प्रदान करते. योग शब्दाचा शाब्दिक अर्थ संस्कृत मध्ये 'योक' असा आहे. म्हणूनच योगाची व्याख्या ही देवाच्या सार्वभौमिक भावनेबरोबर व्यक्तिगत भावना एकत्रीत करणे अशी करता येते.

Answered by thokalganesn78
0

Explanation:

योगाची सविस्तर व्याख्या करा

Similar questions