प्रसंग लेखन- YUN २ प्रश्न. पुढील मुद्दे वाचा आणि दिलेल्या प्रसंगाचे वर्णन करा : सोसाट्याचा वारा आनंददायी वातावरण विजांचा कडकडाट पावसाळ्यातील एक दिवस पावसात भिजण्याचा आनंद जोरदार पाऊस Marathi me composition chahiye plz 2 big paragraph
Answers
पाऊस मला खूप आवडतो. पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. पावसाळ्यातल्या गमती जमती खूप मस्त असतात. असाच एक पावसाळ्यातला दिवस माझ्या मनात घर करून राहिला आहे.
शनिवारी सकाळी ४.३० ला पावसाच्या आवाजाने मला जाग आली. घराच्या छतावर पाऊस जोर जोरात कोसळत होता. त्याच्या आवाजाने घरातले सगळेच जागे झाले. मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. झाडांचा जोर जोरात हलण्याचा आवाज येत होता. मी तर घाबरूनच गेलो आणि आईला जाऊन बिलगलो.
तेवढ्यात लाईट गेली. माझी छोटी बहीण तर रडायला लागली. तिलाही आईने जवळ घेतले आणि शांत केले. बाबांनी दिवा लावला. दिव्याच्या प्रकाशात खिडकीतुन बाहेर बघितला तर मुसळधार पाऊस होता. रस्त्यावर पाणी वाहत होते. आईने मला आणि माझ्या बहिणीला तिच्या जवळ झोपवले.
सकाळी ७ वाजता मला जाग आली तेव्हाही पाऊस पडतच होता. मी उठलो तर आई म्हणाली कि आज पाऊस खूपच आहे, नदीला पाणी पण खूप आले असेल तर तू आज शाळेला जाऊ नको. ते ऐकून मला थोडा दुःखच झाले कारण कि आज शाळा सुटल्यावर मैदानावर खेळण्याचा आमचा इरादा होता.
तरीही पाऊसाचे रौद्र रूप बगुन घरी राहण्याच्या विचारला मीही संमती दिली.
मी खिडकीजवळ खुर्ची घेऊन बाहेरचा पाऊस बगत बसलो. पाऊसाचा जोर आता थोडा कमी झाला होता पण रिमझिम सुरुच होती. सूर्यदेवाचे आगमन झाले होते.
डोंगराच्या बाजून थोडेसे इंद्रधनुष्यही दिसत होते. आमच्या घरच्या ओसरीजवळ कुत्र्याचे छोटी छोटी पिल्ली कुडकुडत बसली होती. आईकडून चपाती घेऊन मी पिल्ल्याना घालायला गेलो. मला बगुन पिल्ली घाबरून गेले. पण मी त्यांना प्रेमाने खाऊ पिऊ घातले. त्यामुळे ती माझ्या पायात खेळू लागली.
तेवढ्यात मला आईची हाक ऐकू आली. आई मला नाश्ता करण्यासाठी बोलावत होती. मी घरात गेलो तर आईने मस्त पैकी पोहे केले होते. पोह्यावर मस्त खोबरे खिसुन टाकले होते. त्याच्यावर थोडासा चहा पिऊन मी तृप्त झालो.
घरात लाईट नसल्यामुळे मला टी. व्ही. बगता येत नव्हती. आम्ही सगळे भावंडे मिळून मस्त पैकी राजा राणी चोर शिपाई खेळात बसलो. खूप मज्जा आली.
दुपारच्या जेवणासाठी आईने पुरी, भाजी, श्रीखंड आणि भजी केली होती. श्रीखंड आणि पुरी वर मी मस्त ताव मारला. पोट दुखेपर्यंत भजी खाल्ले. त्यामुळे मला मस्त झोप आली. आजीच्या कुशीत मस्त झोपी गेलो.
संद्याकाळी मी उठलो तर पाऊस संपूर्ण थांबला होता. वातावरण खूप मस्त झाले होते. लाईट आली होती. बातम्यांमध्ये पावसाच्या बातम्या दाखवत होते. दारात पाऊसामुळे तळे साचले होते. शेजारची मुले पाण्यात खेळत होती. वातावरण इतके सुंदर झाले होते कि जे मी यापूर्वी कधीही बघितले नव्हते. आजचा दिवस खूपच सुदर होता व तो मला आयुष्यभर लक्ष्यात राहील.
Hope it helps.
Answer:
noobxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx