(२) प्रसारमाध्यमांची आवश्यकता
Answers
Answer:
प्रसारमाध्यमांची विविध कारणांसाठी आवश्यकता असते.
Explanation:
१. प्रसारमाध्यमांचे प्रमुख कार्य हे माहिती व सत्य समाजापर्यंत पोहोचवणे हे असते.
२. माहिती ही मुक्त व सत्य प्रवाहात समाजात पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.
३. प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची आधारस्तंभच असतात. त्यामुळे, लोकशाही अधिक सुदृढ व मजबूत होण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.
४. समाजातील घडामोडी व सरकारच्या योजना लोकांना दाखवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.
५. प्रसारमाध्यमांमुळे लोकशिक्षण तसेच समाजप्रबोधन होण्यास मदत मिळते.
६. प्रसारमाध्यमांमुळे माहितीची देवाणघेवाण होते. ज्ञानाचा प्रसार होतो.
अधिक माहिती:
१. प्रसारमाध्यमे:
जी माध्यमे माहितीचा प्रसार करतात म्हणजेच माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवतात, त्यांना प्रसारमाध्यमे म्हणतात.
२. पूर्वीच्या काळात राजे, महाराजे यांच्या सूचना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावांत दवंडी पिटली जात असे.
३. एकाकडून दुसऱ्याला, दुसर्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रसार होत असे.
४. कालांतराने, वृत्तपत्रे, नियतकालिके ही प्रसारमाध्यमे म्हणून अस्तित्वात आली.
५. वर्तमानपत्र हे माहितीचे तसेच ज्ञानाचेही साधन बनले.
Answer:
I hope help you
Explanation:
Ask any questions
