) प्रसारमाध्यमांना समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून ओळखले जाते.
) लोकशाही शासन व्यवस्था मानवी सुरक्षेसाठी उपयुक्त आहे.
please give me answer urgent
Answers
Explanation:
प्रसाराचे साधने जेव्हा एका गोष्टीचे अथवा वस्तुचे प्रसारण करते तेव्हा ते समाजाचे प्रबोधन करायचे साधन देखिल म्हटले जाते. ज्या गोष्टी समाजप्रबोधन करतात त्यांनाच प्रसाराचे माध्यम म्हणून ओळखले जाते.
Answer:
प्रसार माध्यम-
ज्या वेळेस एखादी गोष्ट प्रसार करायची असेल त्यावेळेस अनेक प्रकारच्या माध्यमांचा उपयोग होतो. वृत्तपत्रे,मासिके, दैनिक यांचा प्रसार माध्यम म्हणून उपयोग होत होता.
प्रसार माध्यमे हे समाज प्रबोधनाचे उत्तम असे कार्य करत असतात. ज्यावेळेस भारत पारतंत्र्यात होता, त्यावेळेस स्वातंत्र्यसैनिकांनी या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती घडवली.
शाहु-फुले-आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवले व समाजात सुधारणा घडवून आणली. अनेक सामाजिक विषयांवर लेख या प्रसार माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून समाजात जनजागृती करता येते.
लोकशाही शासन व्यवस्था-
जी शासन व्यवस्था सामान्य जनतेला सर्व अधिकार बहाल करते, तसेच सामान्यातील सामान्य व्यक्ती चा विचार करते, त्याचे मत लक्षात घेते अशी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था.
लोकशाही शासन व्यवस्थेमुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट अशी अधिकार मिळतात ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट असे महत्त्व प्राप्त होते. लोकशाही शासन व्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळतो.
समाजातील प्रत्येक घटक हा कसा समान आहे याची जाणीव लोकशाही शासन व्यवस्थेमुळे मिळते. आणि म्हणूनच लोकशाही शासन व्यवस्था ही मानवासाठी अतिशय उपयुक्त आहे असे म्हणता येईल कारण लोकशाहीमुळे प्रत्येक मानवाला आपले अस्तित्व सिद्ध करता येते.