History, asked by prakashtale433, 1 month ago

प्रश्न 2) पाठात शोधून लिहा.
1) शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील?​

Answers

Answered by ankeshbhanderi
18

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला. वयाच्या केवळ २९ व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजे धार्मिक धोरणासंबंधी किती उदारमतवादी होते हे प्रत्येकांनी कधीही नजरेआड करून चालणार नाही. तेव्हा त्यांची गुणवैशिष्ट्ये ही प्रत्येकांनी आदर्श घ्यावीत अशीच आहेत. पाहुयात त्यांची अशीच काही खास गुणवैशिष्ट्ये जी आपल्यालाही स्वीकारता येतील.

Similar questions